'तुझे मेरी कसम' म्हणत रितेश देशमुख या १६ वर्षीय अभिनेत्रीच्या पडला होता प्रेमात.......
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 10:55 AM2017-10-26T10:55:28+5:302017-10-26T16:25:28+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून लयभारी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' ...
ह ंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून लयभारी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूड पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. या दोघांच्या पहिल्या भेटीची कहाणीसुद्धा तितकीच रंजक आहे. दोघंही पहिल्यांदा हैदराबाद विमानतळावर भेटले. यावेळी १६ वर्षीय जेनिलिया तिच्या आईसोबत होती. रितेश म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लेक.मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने रितेशला भारी अॅटिट्यूड असेल असं त्यावेळी जेनिलियाला वाटलं. त्यामुळं तिनंच रितेशला अॅटिट्यूड द्यायला सुरुवात केली. यावेळी जेनिलियाला ऑकवर्ड वाटत असावं असा रितेशचा समज झाला.जेनिलियाने अॅटिट्यूड देऊनही रितेश जेनिलिया आणि तिच्या आईसमोर नम्रपणेच वागत होता. त्यानंतर सेटवरच्या लोकांशीही रितेशचे वागणेबोलणे पाहून जेनेलियाला त्याच्या चांगल्या स्वभावाची ओळख पटली आणि त्यानंतर दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. रितेश आणि जेनेलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये पूर्ण केलं. शूटिंग आटोपल्यानंतर दोघंही आपापल्या घरी परतले. दोघांना सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी इतकी सवय झाली होती की दोघं एकमेकांना मिस करु लागले.मग बोलण्यासाठी त्यांनी फोनचा आधार घेतला.दोघांचं इतकं बोलणं व्हायचं की त्यांची आधी घट्ट मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे कुणालाच कळलं नाही. दोघांत प्रेमाची कबुली आधी कुणी दिली होती याचं कोडं आजही दोघांना उमगलं नाही. दोघे एकमेकांना भेटायचा नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत असत. आपल्या प्रेमाच्या नात्याला पती पत्नीचा दर्जा द्यावा असं दोघांना मनोमनी वाटू लागलं.मात्र जेनिलिया ख्रिश्चन असल्याने देशमुख कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध झाल्याचं बोललं जातं. मात्र कालांतराने रितेश-जेनिलियाच्या नात्याला सा-यांची संमती मिळाली. अखेर १० वर्षाच्या रोमान्स नंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश-जेनिलिया रेशीमगाठीत अडकले. या दोघांचं दोनदा लग्न झालं. आधी हिंदू पद्धतीने मग ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं शुभमंगल थाटात पार पडलं.