राखीपासून विभक्त झाल्यानंतर रितेशने घेतला महत्त्वाचा निर्णय; पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:08 PM2022-02-17T13:08:05+5:302022-02-17T13:08:29+5:30

Ritesh singh: अलिकडेच रितेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने राखीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ritesh singh shares a video with ex wife rakhi sawant says need to erase these memories | राखीपासून विभक्त झाल्यानंतर रितेशने घेतला महत्त्वाचा निर्णय; पोस्ट शेअर करत दिली माहिती

राखीपासून विभक्त झाल्यानंतर रितेशने घेतला महत्त्वाचा निर्णय; पोस्ट शेअर करत दिली माहिती

googlenewsNext

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यावेळी तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी राखीने पती रितेशसोबत (Ritesh singh)विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राखीने याविषयी माहिती दिली. त्यामुळे तेव्हापासून राखी सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच आता रितेशनेही एक पोस्ट शेअर करत सारं काही संपलं असं सांगणारी पोस्ट शेअर केली आहे.

अलिकडेच रितेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने राखीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु, या व्हिडीओला त्याने जे कॅप्शन दिलंय ते कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

"या जुन्या आठवणी विसरण्याची गरज आहे", असं रितेशने ही पोस्ट शेअर करत कॅप्शन दिलं आहे. परंतु, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. केवळ प्रसिद्धीसाठी रितेशने राखीसोबत प्रेमाचं नाटक केलं असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या आरोपांवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला रितेश?

"एखाद्या व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी एक व्यक्ती काय काय करतो. एक कम्प्युटर इंजिनिअर रातोरात बिग बॉसच्या घरात जातो. अॅक्टिंग न करता खरंच गेम खेळतो. प्रामाणिकपणे गेम खळतो. डान्स पण पहिल्यांदाच करतो. पण, तरी तो शोमधून बाहेर जातो. या घरातून बाहेर आल्यानंतर सुद्धा ट्रोलर्स ट्रोल करतात. तरी पण आम्ही हिंमत करुन काही रिल्स करतो तर तेदेखील त्यांना मान्य नाही," असं रितेश म्हणतो,

पुढे तो म्हणतो, "मला प्रसिद्ध मिळवण्याची काही हौस नाहीये. जर खरंच हौस असती तर दोन वर्षांपूर्वीच सगळ्यांसमोर आलो असतो. या प्रसिद्धीमुळे माझं घर चालत नाही. आता फक्त लोकांना कसं खूश ठेवायचं हे शिकायला हवं. मला खोटा मुखवटा घेऊनच वावरावं लागेल. जरी एखादी व्यक्ती आवडत नसेल तरीदेखील खोटी स्माइल द्यावी लागेल."

दरम्यान, अलिकडेच राखी सावंतने एका मुलाखतीत रितेशनेच आमचं नातं तोडलं असं सांगितलं. रविवारी तो सकाळी उठला आणि अचानकपणे  त्याची बॅग पॅक करु लागला.आणि, यापुढे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही असं सांगितलं. त्याचं त्याच्या एक्स पत्नीसोबत स्निग्धा प्रियासोबत काही कायदेशीर प्रॉब्लेम सुरु आहेत. त्यामुळे त्याने माझं घर सोडलं असं राखी म्हणाली. 

Web Title: ritesh singh shares a video with ex wife rakhi sawant says need to erase these memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.