रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या शेजाऱ्यांचे समोर आले मत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 18:34 IST2020-08-26T18:34:19+5:302020-08-26T18:34:45+5:30
सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर त्याच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी रियावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि कुटुंबापासून दूर केल्याचा आरोप केला आहे.

रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या शेजाऱ्यांचे समोर आले मत, म्हणाले...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता देशातील तीन एजेंसी करत आहे. सीबीआय, ईडी आणि या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचीदेखील एन्ट्री झाली आहे. रियाला घेऊन दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता रिया आणि तिच्या कुटुंबाबद्दल शेजारच्यांचे मत समोर आले आहे.
आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीच्या शेजारीने सांगितले की, चक्रवर्ती फॅमिली खूप चांगली आणि डिसेंट आहेत. मी सुशांतची खूप मोठी चाहती आहे. मी सुशांतला कित्येकदा रियाच्या घरी येताना पाहिले आहे. सुशांत शेजाऱ्यांशी बोलायचा.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी, कुटुंबापासून दूर करण्यासाठी आणि पैसे बळकवल्याचा आरोप केला आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अमली पदार्थ सेवन व तस्करीत रियाचा सहभाग असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी ) आहे. रियाकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलपैकी एकामधील व्हाट्सअपचॅटमध्ये अमली पदार्थाबाबत अस्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ड्रग्जचे सेवन व ती मागविण्यात तिचा कनेक्शन आहे का, या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकालाही कळविण्यात आले आहे. मात्र राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीच्या वकीलने प्रकरण उघडकीस आल्यानंतर वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.