'रिया चक्रवर्तीला फसवलं जातंय?,' रियाचं समर्थन करणं स्वराच्या आलं अंगाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:12 PM2020-09-01T13:12:08+5:302020-09-01T13:12:58+5:30
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ स्वरा भास्कर पुढे सरसावली आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी आणि एनसीबी तपास करत आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी असल्यामुळे रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली आणि तिला खूप टीका सहन करावी लागली. या दरम्यान आता तिच्या समर्थनात अभिनेत्री स्वरा भास्करने आवाज उठविला आहे.
स्वरा भास्कर सातत्याने सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहे. यासोबतच रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ स्वरा पुढे सरसावली आहे. स्वराने याप्रकरणी आपले मत देत सांगितले की, रिया चक्रवर्तीला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वराने ही बाब सोशल मीडियावर युजरच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सांगितले.
Hey Voyeurs & shameless conscience-less anchors! Chat Proves #RheaChakraborty had informed the family about the mental health of SSR way back in 2019. Why did all the high decibel, screaming shouting anchors conveniently ignore this story? Does it seem like Rhea is being framed? https://t.co/qFWDuEw6B2
— Swara Bhasker (@ReallySwara) August 30, 2020
एका सोशल मीडिया युजरने ट्विटरवर एक चॅट शेअर केले ज्यात सुशांतची आधीची मॅनेजर श्रुती मोदीने सुशांतच्या बहिणीला त्याच्या मानसिक आजार व डॉक्टरांबद्दल माहित होते. याउलट सुशांतच्या घरातल्यांनी सांगितले होते की त्यांना सुशांतच्या आजाराबद्दल कुणीच काही सांगितले नव्हते. स्वरा भास्करने या ट्विटला रिट्विट करत मीडिया ट्रायल करणाऱ्यांवर राग व्यक्त केला आहे.
स्वराने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की चॅट सांगते की रिया चक्रवर्तीने 2019 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला त्याच्या मानसिक आजाराबद्दल सांगितले होते. मोठ्या आवाजात बोलणारे अँकर या स्टोरीकडे कानाडोळा करत आहेत का?, असे वाटते का की रियाला यात फसविले जात आहे? सोशल मीडियावर स्वराचं हे ट्विच व्हायरल होत आहे.
श्रुती मोदी आणि सुशांतची बहिण मीतू सिंग यांचे व्हॉट्सएप चॅट खूप व्हायरल होत आहे, ज्यात धक्कादायक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि मुंबई पोलिसांनुसार सुशांत मानसिक आजार आणि नैराश्याशी सामना करत होता. मात्र सुशांतच्या घरातल्यांनी हे म्हणणे फेटाळून लावले आहे. त्यांनी म्हटले की, त्यांना सुशांतच्या तब्येतीबद्दल कोणीच माहिती दिली नव्हती पण श्रुती मोदी व मीतू सिंग यांच्या व्हॉट्सएप चॅटवरून समजते आहे की कुटुंबाचे आरोप निराधार आहेत