ईच्छा असूनही मिळत नाही अभिनेत्रीला मनासारखी काम, म्हणून बॉलिवूडमधून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 04:23 PM2020-11-04T16:23:31+5:302020-11-04T16:27:16+5:30

करियरच्या सुरुवातीपासूनच रिया सेनकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याच प्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. या सेक्सी अभिनेत्रीचं खासगी जीवनही तितकंच वादग्रस्त राहिलं.

Riya Sen Says Being Sexualised In Films Made Her So Uncomfortable Decided To Quit Bollywood | ईच्छा असूनही मिळत नाही अभिनेत्रीला मनासारखी काम, म्हणून बॉलिवूडमधून आहे गायब

ईच्छा असूनही मिळत नाही अभिनेत्रीला मनासारखी काम, म्हणून बॉलिवूडमधून आहे गायब

googlenewsNext

'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री रिया सेनकडे सध्या कोणतेही सिनेमे नाहीयेत. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत तिने अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण केले होते.  गेल्या कित्येक वर्षापासून तिचे रूपेरी पडद्यावर दर्शन घडलेले नाही. जितक्या लवकर ती प्रकाशझोतात आली तितक्याच लवकर ती इंडस्ट्रीतून गायब ही झाली. 


करियरच्या सुरुवातीपासूनच रिया सेनकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याच प्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. या सेक्सी अभिनेत्रीचं खासगी जीवनही तितकंच वादग्रस्त राहिलं. अभिनेता अश्मित पटेलसोबत असलेल्या अफेअरसह दोघांचा अश्लील एमएमएसही लीक झाला होता. इतकंच नाहीतर रागिनी एमएमएस सिनेमाच्या सेटवर आपल्या पुरुष कोस्टारचे कपडे उतरवल्याचा आरोपही तिच्यावर झाला. 

अभिनेता निशांत मलकानीने रिया सेनवर गंभीर आरोप केले होते. रागिनी एमएमएस चित्रपटात एक इंटीमेट सीन करताना रियाने आपल्या मर्जीशिवाय कपडे काढल्याचा धक्कादायक खुलासा केला. २०१६ साली एका पार्टीतही रिया बेधुंद झाल्याचे दिसून आलं. या पार्टीत रिया एका मुलीला वाईल्ड पद्धतीने किस करत असल्याचे पाहायला मिळालं. इतकंच नाही तर दुसऱ्या पुरुषांसोबतही ती अश्लील पद्धतीने फोटो काढत होती. 

मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये गेली त्यावेळी घडलेला किस्सा तर माध्यमांमध्ये रंगला होता. रियाने या रेस्टॉरंन्टच्या वेटरकडे चक्क सेक्सची मागणी केली. खरं तर रियाला डिश ऑर्डर करायची होती.

मात्र त्यावेळी रियाने म्हटलं होतं की Could I have some SEX please. हे ऐकून तर वेटरला घामच फुटला होता. मात्र आपण काही तरी भलतंच बोलून गेल्याचं रियाला उमगलं आणि तिनं ती चूक सुधारली होती. 

Web Title: Riya Sen Says Being Sexualised In Films Made Her So Uncomfortable Decided To Quit Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.