युजवेंद्र चहलला डेट करतीये RJ माहवश? स्पष्टीकरण देत म्हणाली, "२-३ दिवसांपासून..."
By ऋचा वझे | Updated: March 10, 2025 11:08 IST2025-03-10T11:07:14+5:302025-03-10T11:08:58+5:30
Yuzvendra Chahal-RJ Mahvash: आर जे माहवशने चहलसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

युजवेंद्र चहलला डेट करतीये RJ माहवश? स्पष्टीकरण देत म्हणाली, "२-३ दिवसांपासून..."
Yuzvendra Chahal-RJ Mahvash: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) काही दिवसांपूर्वीच धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. काल दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये युजवेंद्र ऑडियन्स स्टँडमध्ये बसून मॅच बघत होता. मात्र यावेळी त्याच्यासोबत एक मुलगीही होती जी आर जे आहे. आर जे माहवशसोबत (Rj Mahavash) बसून तो फायनलचा आनंद घेत होता. दोघांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. युजवेंद्रच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा जोरदार सुरु झाली. आता या चर्चांवर स्वत: आरजे माहवशने स्पष्टीकरण दिलं आहे.
आर जे माहवशने सोशल मीडियावर फायनलचा आनंद घेतानाचे काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती मॅच एन्जॉय करताना दिसतीये. ती युजवेंद्र चहलच्या बाजूला बसून मॅच पाहत होती त्यामुळे देशभरात त्यांची चर्चा सुरु झाली. या सर्व चर्चांमध्ये आता माहवशने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत लिहिले, "इंटरनेटवर काही आर्टिकल्स आणि अफवा पसरवल्या जात आहेत. तथ्यहीन चर्चा पाहून खरंतर हसूच येत आहे. मुलगी जर एखाद्या मुलासोबत किंवा पुरुषासोबत दिसली तर ते डेट करत आहेत असाच त्याचा अर्थ होतो का? मग तुम्ही सगळेच असं किती लोकांना डेट करत आहात? मी २-३ दिवसांपासून संयम ठेवून होते पण दुसऱ्याची प्रतिमा कव्हर करण्यासाठी आता मी पीआर टीम्सला माझं नाव आणू देणार नाही. कृपया माणसाला त्याच्या कठीण प्रसंगी मित्रपरिवारासोबत शांततेत राहू द्या."
कोण आहे आरजे महावश?
महावश ही दिल्लीची रेडिओ जॉकी आहे. आवाज आणि एंटरटेन्मेंट स्टाईलसाठी ती प्रसिद्ध आहे. याशिवाय ती सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरही आहे. तिला बिग बॉस आणि नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर होती अशीही चर्चा आहे. तिने 'सेक्शन १०८' या सिनेमाची निर्मिती केली आहे.