प्रेक्षकांना भावतात 'रोम-कॉम' सिनेमे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:12+5:302016-02-09T10:46:33+5:30
संवेदनशील मनाच्या सिने चाहत्यांच्या हृदयात अशा चित्रपटांसाठी नेहमीच एक खास जागा असते. या आठवड्यात असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ...
स वेदनशील मनाच्या सिने चाहत्यांच्या हृदयात अशा चित्रपटांसाठी नेहमीच एक खास जागा असते. या आठवड्यात असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहिद कपूर व आलिया भट यांचा 'शानदार' हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडी या गटात मोडणारा आहे. याआधीच्या अशाच काही कायम नवे भासणार्या चित्रपटांची ही माहिती.. छोटी सी बात : हा मजेदार हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. अमोल पालेकरने साकारलेला एका भोळा युवक विद्या सिन्हाच्या प्रेमात पडतो. या सिनेमातून 70 च्या दशकातील मुंबईचे दर्शन घडते. या यादीत अभिषेक-प्रियंका-जॉन अब्राहम स्टारर 'दोस्ताना', अमिताभ बच्चन - तब्बूच्या अभिनयाने सजलेला 'चीनी कम' यांचाही उल्लेख करता येईल. शानदार हा चित्रपटही याच रांगेत आपली जागा बनवेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. दिल है की मानता नही : 'इट हॅपन वन नाईट' या चित्रपटाचे उत्कृष्ट हिंदी रुपांतरच आहे. दोन सुंदर कलावंतानी साकारलेल्या या चित्रपटात अमीर खान व पूजा भट्ट यांनी भूमिका केल्या आहेत. यात संवादी र्पिोटरची भूमिका आमीरने केली आहे. पूजा भट्टचा अभिनय थंड हवेच्या झुळकीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतो. प्यार के साईड इफेक्ट्स : रोमाँटिक व फन्नी रिलेशनशीपची ही कथा, 'तौबा मैं प्यार करके पछतावा' हे गीत संपूर्ण तरुणाईला आपलेसे वाटले. जिच्यावर आपण प्रेम करतो त्या स्त्रीशिवाय जगण्यात मजा नाही असाच संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. राहुल बोस व मल्लिका शेरावत हे एकमेकांच्या प्रेमात असतात. लग्नाचा विचार त्यांच्यासाठी केवळ गप्पांपुरता असतो. परंतु या प्रवासतील एका पार्टीत त्यांना प्रेमाची खरी जाणीव होते. जाने तू.. या जाने ना : नव्या चेहर्यांना घेऊन तयार केलेल्या या चित्रपटाचा विषयदेखील नवाच होता. मेत्रीचे नवीन कंगोरे यातून उलगडण्याचा प्रयत्न दिग्र्दशकांनी केला. इमरान खान व जेनेलिया डिसूजा हे दोन खास मित्र प्रेमात पडतात व ते परस्परांच्या प्रेमात पडलेत याची जाणीव त्यांना त्यांचे मित्र करून देतात अशी ही कथा आहे. दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे : सर्वोत्कृष्ट कथानक असलेल्या या चित्रपटात राज व सिमरणची कहानी आहे. प्रत्येक मुलगी आपल्या राजला शोधत असतेच, तो आपल्या घरी यावा घरातील कामे करून सर्वांची मने जिंकावी व अखेर त्यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचावे, अशी तिची इच्छा असते. या सिनेमाने नव्या पिढीला प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. या चित्रपटात शाहरुख व काजोलच्या एव्हरग्रीन जोडीने कमालच केली आहे. 20 वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा 'दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे' हा सिनेमा प्रेमाचे महाकाव्य म्हणावे असाच आहे. 'जब वी मेट' हा परफेक्ट डेट सिनेमा आहे. 'जाने तू या जाने ना' कित्येकदा पाहिला तरी पुन्हा बघावा असाच चित्रपट आहे. संवेदनशील मनाच्या सिने चाहत्यांच्या हृदयात अशा चित्रपटांसाठी नेहमीच एक खास जागा असते. या आठवड्यात असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहिद कपूर व आलिया भट यांचा 'शानदार' हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडी या गटात मोडणारा आहे. याआधीच्या अशाच काही कायम नवे भासणार्या चित्रपटांची ही माहिती.