रॉक ऑन माझ्या करिअरचा टर्निंग पॉँईट ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 04:54 AM2017-04-26T04:54:05+5:302017-04-26T10:24:05+5:30
रॉक ऑन, रॉक ऑन 2मध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर ल्यूक केनीने आपली वेगळी छापा सोडली आहे. वीजे ते अभिनेता ...
र क ऑन, रॉक ऑन 2मध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर ल्यूक केनीने आपली वेगळी छापा सोडली आहे. वीजे ते अभिनेता हा त्याचा प्रवास कौतुकास्पद आहे. त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत त्याच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद
तुझ्या अभिनयक्षेत्रातील प्रवासाला कशी सुरुवात झाली ?
शाळेत असताना आपल्यापैकी प्रत्येकाला आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत असते. शाळेत असताना मी नाटकात काम करण्याची संधी मिळाली. स्टेजवर जाऊन अभिनय करणे मी एन्जॉय करु लागलो. तिथे अभिनय क्षेत्रात करिअर करायचे हा विचार डोक्यात आला होता. तसेच त्यावेळी माझे मित्र मला नौटंकी करतोस म्हणून चिडवायचेदेखील. शाळेनंतर मी कॉलेजमध्ये ही नाटकात काम करणे सुरु ठेवले. कॉलजेमध्ये माझ्या एका नाटकाला एक दिग्दर्शक आले होते. त्यांना माझा अभिनय आवडला आणि त्याच्या पुढच्या चित्रपटात त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.
'रॉक ऑन' हा चित्रपट तुझ्या करिअरमध्ये टर्निंग पाईंट ठरला असे तुला वाटते का ?
हो नक्कीच. तुम्हाला माहितीच आहे की रॉक ऑनच्या आधी मी चॅनल व्हीवर विजे म्हणून काम करत होतो. रॉक ऑनमुळे आजच्या पिढीच्या अधिक संपर्कात आलो. तसेच अभिषेक कपूरने त्याच्या चित्रपटाच्या टीमला माझी निवड करण्यापूर्वी सांगितले होते मी यात एका अशा व्यक्तीची निवड करेन जो संगीतकार असेल आणि त्यांने माझी निवड केली. रॉकऑन मधील माझी भूमिका माझ्या इमेजला छेद देणारी होती. मला या चित्रपटामुळे नवी ओळख मिळाली. रॉक ऑन2मध्यली ही माझी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
तुझ्या आगामी प्रोजेक्ट विषयी का सांगशील ?
मी रॉक ऑन सारख्या एका मराठी चित्रपटावर येतोय यावर माझ काम सुरु आहे. 4 म्युझिशनची ही कथा आहे ज्यांची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे. बस यापेक्षा जास्त मी काही याबाबत सांगू शकत नाही. पण बँजोनंतर अनेक मराठी चित्रपटांच्या ऑफर मला येतायेत. तसेच सध्या मी एका चित्रपटासाठी तो को-रायटर म्हणून लिहितो आहे.
आजच्या म्युझिक रिअॅलिटी शोबद्दल तुझे मत काय आहे ?
रिअॅलिटी शो अमेरिकेतील आणि आपल्याकडेच शो यात खूप फरक आहे. अमेरिकेत म्युझिक इंडस्ट्री आहे. म्युझिकमध्ये करिअर करायला संधी आहेत. मात्र आपल्याकडे असे नाही. आपल्या टेंलेंट येत आणि जाते. शो संपल्यानंतर त्यांच्या हाती फारसे काही लागलेल नसते. शो संपला की लोकांनाच्या ते कलाकार लक्षात ही राहत नाहीत.