“जया बच्चन माझ्यासाठी सेटवर मटण घेऊन आल्या अन्...”, क्षिती जोगने सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:08 PM2023-08-09T20:08:52+5:302023-08-09T20:09:09+5:30
क्षिती जोगने सांगितला 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी'च्या शूटिंगदरम्यानचा 'तो' किस्सा
करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही झळकली आहे. या चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातील क्षितीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
क्षितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से सांगितले. या मुलाखतीत तिला “या चित्रपटात जया बच्चन यांच्याबरोबर तुझे अनेक सीन्स आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना क्षितीने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला. क्षिती म्हणाली, “त्यांच्याबरोबर काम करताना खूपच मज्जा आली. एक दिवस आम्ही रविवारी शूट करत होतो. आमचं पॅक अप लवकर झालं. आमच्या घरी रविवारी मटण-भाकरीचा बेत असतो. त्यामुळे मला लवकर घरी जायचंय, असं म्हणून मी निघाले.”
सनी देओलच्या ‘गदर २’ला पंजाबमध्ये बॉयकॉट करण्याची मागणी, समोर आलं मोठं कारण
“पुढच्या रविवारीही आमचं शूटिंग होतं. त्यावेळी जया बच्चन माझ्यासाठी मटण घेऊन आल्या होत्या. तुम्ही खाता म्हणून तुझ्यासाठी मी मटण घेऊन आले आहे, असं त्या मला म्हणाल्या. कोणीतरी एकदा पराठे मला आवडतात, असं म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशी त्या सेटवर पराठे घेऊन आल्या होत्या. त्यांचा स्वभाव खऱ्या आयुष्यात फार कडक आहे. पण, ऑन स्क्रीन जशा आम्ही सासू-सूनेच्या भूमिकेत दिसल्या आहोत. त्यापेक्षा वेगळं आमचं ऑफ स्क्रीन नातं होतं,” असंही क्षितीने सांगितलं.
“दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ हा एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दहा दिवसांत करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.