संसदेत लॉन्च होणार ‘रागदेश’चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2017 11:59 AM2017-06-25T11:59:50+5:302017-06-25T17:29:50+5:30

आगामी ‘रागदेश’ या चित्रपटाचा ट्रेलर संसदेत लॉन्च केला जाणार आहे. दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांचा हा चित्रपट स्वतंत्रता संग्राम लढ्यातील ...

Rogaad's trailer to be launched in Parliament | संसदेत लॉन्च होणार ‘रागदेश’चा ट्रेलर!

संसदेत लॉन्च होणार ‘रागदेश’चा ट्रेलर!

googlenewsNext
ामी ‘रागदेश’ या चित्रपटाचा ट्रेलर संसदेत लॉन्च केला जाणार आहे. दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांचा हा चित्रपट स्वतंत्रता संग्राम लढ्यातील वीरांवर आधारित आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी ट्रेलर संसद भवनात लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

धुलिया यांनी सांगितले की, ‘स्वतंत्रता संग्रामातील खºया नायकांचा सन्मान करण्याच्या हेतूनेच चित्रपटाचा ट्रेलर संसदेत लॉन्च केला जाणार आहे. असे पहिल्यांदाच घडत आहे की, संसदेत एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हा आमच्या चित्रपटासाठी खूप मोठा सन्मान असेल.’ चित्रपटाची कथा प्रसिद्ध लाल किल्ल्याच्या खटल्यावर आधारित आहे. आझाद हिंद फौजेच्या तीन अधिकाºयांवर हा खटला चालविण्यात आला होता. या खटल्याने भारतीय स्वातंत्र्यता आंदोलनाची दिशाच बदलली होती. 



धुलिया यांनी याविषयी म्हटले की, ‘लाल किल्ला ट्रायल आपल्या स्वतंत्रता इतिहासातील सर्वांत मोठा उत्कंठा वाढविणारा आणि प्रासंगिक भाग आहे. हा चित्रपट त्याच्याशी संबंधित आहे.’ दरम्यान, चित्रपटात कुणाल कपूर, अमित साध, मोहित मारवाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुरदीप सिंग सप्पल निर्मित हा चित्रपट राज्यसभा टीव्हीच्या वतीने सादर केला जाणार आहे. हा चित्रपट २८ जुलै रोजी सर्वत्र रिलीज केला जाईल. 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. त्यामध्ये आझाद हिंद फौजेचा रुबाब स्पष्टपणे दिसत होता. या चित्रपटातून स्वतंत्रता संग्रामाचा थरार दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, या पोस्टरला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाल्याने बॉक्स आॅफिसवर चित्रपट काय करिष्मा दाखवेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Rogaad's trailer to be launched in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.