'रजनीकांत कोराना पॉझिटिव्ह' लिहून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला रोहित रॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 17:15 IST2020-06-05T17:09:29+5:302020-06-05T17:15:55+5:30
अभिनेता रोहित रॉयला रजनीकांत यांच्यावर केले ट्विट चांगलेच महागात पडले आहे.

'रजनीकांत कोराना पॉझिटिव्ह' लिहून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला रोहित रॉय
सुपरस्टार रजनीकांत आणि कोरोनाबाबत केलेले ट्विट अभिनेता रोहित रॉयला चांगलेच महागात पडले आहे. रजनीकांत यांचे प्रचंड फॅन फॉलोव्हिंगआहे आणि चाहते त्यांना देवापेक्षा कमी मानत नाहीत. रजनीकांत यांच्या संदर्भात रोहितने केलेल्या पोस्टमुळे त्याला जोरदार ट्रोल केले गेले आहे.
रोहितने सुपरस्टार रजनीकांत यांच्याविषयी एक जोक शेअर केला. या पोस्टमध्ये लिहिले होते, रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत आणि त्यांना क्वॉरांटाईन करण्यात आले आहे. हा विनोद रजनीकांत यांच्या फॅन्सना चांगलाच खटकला आणि मग इथून रोहितला ट्रोल करण्याची सुरुवात झाली.
शेवटी रोहितने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, मित्रांना शांत व्हा, इतकी चिडचिडे करु नका. एका विनोदला विनोदसारखेच घ्या ...मला नाही वाटत की हा कोणत्याही प्रकारे चुकीचा विनोद होता.
पुढे त्याने लिहिले, हा एक टिपिकल रजनीकांत सरांच्या स्टाईलचा विनोद होता. माझे इंन्टेंशन फक्त या विनोदाने सर्वांना हसवणे इतकेच होते. रोहित म्हणतो, टीका करण्याआधी एखाद्या माणसाचा हेतू समजून घ्या. हा विनोद मी कुणाच्या भावना दुखावण्यासाठी केला नव्हता ज्या प्रकारे तुम्ही मला टार्गेट करत आहात.