एकेकाळी अक्षय कुमारचा बॉडी डबल म्हणून काम करायचा हा मुलगा, आता स्वतः आहे सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 10:00 AM2023-11-04T10:00:35+5:302023-11-04T10:03:05+5:30

नव्वदीच्या दशकात अनेकवेळा अभिनेता नाही तर त्यांचे बॉडी डबल अ‍ॅक्शन सीन शूट करायचे. सुहाग या चित्रपटात देखील अक्षयने अ‍ॅक्शनसाठी बॉडी डबलचा वापर केला होता.

Rohit shetty once worked as akshay kumar body double made sooryavanshi with actor given most number of rs 100 crore films | एकेकाळी अक्षय कुमारचा बॉडी डबल म्हणून काम करायचा हा मुलगा, आता स्वतः आहे सुपरस्टार

एकेकाळी अक्षय कुमारचा बॉडी डबल म्हणून काम करायचा हा मुलगा, आता स्वतः आहे सुपरस्टार

अक्षय कुमार, अजय देवगण, करिश्मा कपूर आणि नगमा यांच्या मुख्य भूमिका असलेला सुहाग सिनेमा १९९४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अ‍ॅक्शन सीन पाहायला मिळाले होते. नव्वदीच्या दशकात अनेकवेळा नायक नव्हे तर त्यांचे बॉडी डबल अ‍ॅक्शन सीन शूट करायचे. सुहाग या चित्रपटात देखील अक्षयने अ‍ॅक्शनसाठी  बॉडी डबलचा वापर केला होता. अक्षयने बॉडी डबलचा वापर केला होता हे वाचल्यावर खरे तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असणार. कारण अक्षय हा अ‍ॅक्शन हिरो मानला जात असल्याने त्याला बॉडी डबलची गरचज काय पडली होती असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण सुहाग या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्य खूपच कठीण असल्याने अक्षय ऐवजी त्याच्या बॉडी डबलने हा सीन शूट केला होता. 

सुहाग या चित्रपटात अक्षय कुमारचा बॉडी डबल बनलेला व्यक्ती आज एक प्रसिद्ध दिग्दर्शक बनला आहे. या दिग्दर्शकाने आजवर  गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिंघम, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांची नाव वाचल्यावर तुमच्या लक्षात आलेच असेल की या दिग्दर्शकाचे नाव काय आहे. हा दिग्दर्शक दुसरा कोणीही नसून रोहित शेट्टी आहे. रोहित शेट्टीनेच सुहाग चित्रपटाच्या वेळेचा किस्सा एका कार्यक्रमात सांगितला होता. सुहाग या चित्रपटाच्या वेळी रोहित नुकताच इंडस्ट्रीत आला असून त्यावेळी तो हिरोंचा बॉडी डबल म्हणून काम करत होता. सुहाग या चित्रपटाच्यावेळी अक्षय आणि अजयला तो सेटवर सर अशी हाक मारायचा. रोहितचे वडील एम.बी.शेट्टी हे बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन होते. त्याच्यामुळेच रोहितला लहान वयापासूनच स्टंटचे आकर्षण वाटू लागले. त्याच्या सगळ्याच चित्रपटात आपल्याला अनेक स्टंट पाहायला मिळतात. 

रोहितने जमीन या चित्रपटाद्वारे त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यामुळे त्याला त्याच्या करियरचे चांगलेच टेन्शन आले होते. त्याच्यासोबत काम करायला कोणीच तयार नव्हते. पण अजय देवगण या त्याच्या मित्राने त्याला साथ दिली आणि त्यानंतर आलेल्या गोलमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही. caknowledge डॉट कॉम नुसार त्याचं एकूण नेटवर्थ २४८ कोटी रूपये इतकं आहे. आज रोहितकडे महिंद्रा स्कॉर्पियो, रेंज रोव्हर स्पोर्ट, लॅम्बोर्गिनी उरुस, फोर्ड मस्टंग जीटी, मर्सिडीज एएमजी जी63 आणि मसेराती ग्रान सारख्या जबरदस्त आणि आलिशान कार आहेत.

Web Title: Rohit shetty once worked as akshay kumar body double made sooryavanshi with actor given most number of rs 100 crore films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.