"मला काहीच फरक पडत नाही..." सुश्मिता सेनसोबतच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 01:22 PM2024-12-10T13:22:18+5:302024-12-10T13:30:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री, विश्वसुंदरी सुश्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे.

rohman shawl open up about relationship with bollywood actress sushmita sen after three years | "मला काहीच फरक पडत नाही..." सुश्मिता सेनसोबतच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचं भाष्य

"मला काहीच फरक पडत नाही..." सुश्मिता सेनसोबतच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचं भाष्य

Rohman Shawl Sushmita Sen Relationship: बॉलिवूड अभिनेत्री, विश्वसुंदरी सुश्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. ललित मोदी, विक्रम भट तसेच १५ वर्षांनी लहान रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) सुश्मिताचं नाव जोडलं गेलं. पण, सुश्मिता आणि रोहमन शॉलच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या. जवळपास तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सुश्मिता-रोहमन यांच्यामध्ये ब्रेकअप झालं. २०२१ मध्ये अभिनेत्री सुश्मिता सेनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यावर या दोघांनीही कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. ब्रेकअप झाल्यानंतर सुश्मिता आणि रोहमन यांना बऱ्याच ठिकाणी  एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. दरम्यान, आता सुश्मिता सोबतच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने भाष्य केलं आहे. 

रोहमन शॉलने नुकताच स्क्रीनसोबत संवाद साधला. त्यादरम्यान त्याने सुश्मिता सोबतच्या नात्यावर भाष्य केलं. त्यावेळी रोहमन म्हणाला, "सुश्मिता आणि तिच्या दोन मुली माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत. आम्ही सोबत राहत नाही. बरेच दिवस एकमेकांना भेटतही नाही, पण याचा अर्थ असा नाही होत की आमच्यामधील नातं संपलं आहे. "

पुढे रोहमन म्हणाला, "जेव्हा कधी त्यांना माझी गरज भासते त्यावेळी मी सुश्मिताकडे जातो. मी त्यांच्यासोबत एकत्र वेळ घालवतो आणि यापुढेही असंच करेन. मी कायम त्यांच्यासोबत असेन."

सुश्मिता सोबतच्या नात्यावर दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, यावेळी सुश्मिता सोबतच्या पॅचअपवर रोहमनला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत तो म्हणाला, "लोक काय म्हणत असतील याचा मला काहीच फरक पडत नाही. मी स्वत: बद्दल काय विचार करतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी माझ्या आयुष्यात जे काही करतोय, ते प्रामाणिकपणे करतोय. त्यामुळे लोकांना जे काही म्हणायचंय ते म्हणू द्या, तो त्यांचा निर्णय आहे."

Web Title: rohman shawl open up about relationship with bollywood actress sushmita sen after three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.