पहिल्यांदाच प्रभूदेवा साकारणार व्हिलनची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 11:42 AM2017-03-15T11:42:58+5:302017-03-15T17:19:56+5:30

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभूदेवा आपल्याला त्याच्या आगामी चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. कोलाझ्युथिर काला नावाच्या तमिळ चित्रपटाचा ...

The role of the villain is for the first time Lord's will be established | पहिल्यांदाच प्रभूदेवा साकारणार व्हिलनची भूमिका

पहिल्यांदाच प्रभूदेवा साकारणार व्हिलनची भूमिका

googlenewsNext
 
ूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभूदेवा आपल्याला त्याच्या आगामी चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. कोलाझ्युथिर काला नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनतो आहेत यात तो नेगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. याचित्रपटात प्रभूदेवाशी तमन्ना भाटिया आणि भूमिका चावलाही आपल्याला दिसतील. याचित्रपटाचे दिग्दर्शन तामिळ चित्रपट चकरि टोलेटीचा दिग्दर्शक करणार आहे. हा हिंदीतील दिग्दर्शनाचा पहिला अनुभव असणार आहे. 
याचित्रपटाच्या प्रॉडक्शनची तयारी वासु भगनानीने आधीच सुरु केली आहे. कोरिओग्राफर दिग्दर्शक प्रभूदेवा हॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर लार्ड ऑफ रिंग्सच्या धर्तीवर त्याला रामायणवर चित्रपट तयार करायचा आहे.  यासाठी तो निर्मात्याच्या शोधात आहे. हा चित्रपट बिग बजेट असले त्यामुळे याचिपटावर खर्च करण्यासाठी तयार व्हावी अशा व्यक्तीच्या तो शोधात आहे. 
सलमान खानच्या वॉटेंड चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केले होते. प्रभूदेवाला अमिताभ बच्चन यांच्यापासून  रजनीकांत यांच्यापर्यंत प्रत्येकाचा चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा प्रभूदेवाची आहे. याआधी प्रभूदेवाला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती मात्र तारखेंचे गणित जुळू न शकल्यामुळे त्याला ही संधी गमवावी लागली. मात्र भविष्यात पुन्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी पुन्हा मिळेल अशी त्याला खात्री आहे.  सोनू सूदचा निर्माता म्हणून पहिलाच चित्रपट ‘तुतक तुतक तुतिया’मध्ये  प्रभूदेवा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा  हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. 

Web Title: The role of the villain is for the first time Lord's will be established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.