रोमँटिक जोडीचा ‘झक्कास’ डान्स; ‘रामलखन’ला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त थिरकले अनिल-माधुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 19:00 IST2019-01-27T19:00:00+5:302019-01-27T19:00:02+5:30
नुकताच अनिल कपूर आणि माधुरी या जोडीचा एक धमाल व्हिडिओ माधुरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघेही त्यांच्या 'रामलखन' चित्रपटातील 'वन टू का फोर' या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत.

रोमँटिक जोडीचा ‘झक्कास’ डान्स; ‘रामलखन’ला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त थिरकले अनिल-माधुरी
९०च्या दशकात कॉलेजात जाणाऱ्या युवापिढीच्या डोळयासमोर एकच रोमँटिक जोडी होती ती म्हणजे बॉलिवूडमधील एव्हरग्रीन जोडी म्हणजेच अनिल कपूर आणि माधुरी. आजही त्यांची ही क्रेझ कायम आहे. एवढ्या वर्षांनंतर त्यांच्यावरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाहीये. सोशल मीडियावर हे दोघेही नेहमी सक्रिय असतात. नुकताच या जोडीचा एक धमाल व्हिडिओ माधुरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघेही त्यांच्या 'रामलखन' चित्रपटातील 'वन टू का फोर' या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत.
'रामलखन' या चित्रपटात माधुरी आणि अनिल कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. यातील सदाबहार गाणे आजही चाहत्यांच्या मनात रुजलेली आहेत. यातील 'ओ रामजी बडा दुख देना तेरे लखन ने' आणि 'वन टू का फोर' ही गाणी तुफान गाजली होती. या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमीत्त चाहत्यांसाठी खास या दोघांनीही 'रामलखन' चित्रपटातील या दोन्हीही गाण्याच्या आठणींना उजाळा देत त्यावर डान्स केला.
माधुरी दिक्षीत आणी अनिल कपूर यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आगामी 'टोटल धमाल' या चित्रपटातून दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. २२ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.