"कपिलला लोक म्हणायचे या काकूबाईशी काय लग्न करतोस"; पत्नीने सांगितला तो अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 08:30 PM2022-11-03T20:30:42+5:302022-11-03T20:39:40+5:30

"चित्रपट बघताना असे वाटले की तुम्ही माझेच जीवन जगत आहात, कपिल देव यांना मी भेटले त्यावेळी मी देखील अशीच दिसायचे.

Romi bhatia says, I saw myself in the movie | "कपिलला लोक म्हणायचे या काकूबाईशी काय लग्न करतोस"; पत्नीने सांगितला तो अनुभव

"कपिलला लोक म्हणायचे या काकूबाईशी काय लग्न करतोस"; पत्नीने सांगितला तो अनुभव

googlenewsNext

Kapil dev wife Romi, Body shaming बॉडी शेमिंगवरुन महिलांना अनेकदा नावे ठेवली जातात. कलाकार मंडळी तर सोशल मीडियावर टाईट कपडे, शरीरयष्टी वरुन ट्रोल होतात. याच विषयाला वाचा फोडणारा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांची प्रमुख भुमिका असलेला डबल एक्सएल हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉडी शेमिंग हा विषय अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. यामध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांनाही बॉडीशेमिंग वरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे. ८३ चित्रपटानंतर कपिल देव डबल एक्स एल मध्येही कॅमिओ करताना दिसणार आहेत. 

४ नोव्हेंबर रोजी डबल एक्सएल सिनेमा रिलीज होतोय. नुकतेच मुंबईत डबलएक्सएलचे स्क्रीनिंग पार पडले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी स्क्रीनिंगला हजेरी लावली. कपिल देव यांनीही पत्नी रोमी भाटिया यांच्यासोबत सिनेमा बघितला. यावेळी रोमी भाटिया काहीशा भावूक झाल्या. सिनेमाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, 'असे वाटले तुम्ही माझेच जीवन जगत आहात, कपिल देव यांना मी भेटले त्यावेळी मी देखील अशीच दिसायचे. अगदी तसेच तुम्ही पडद्यावर दाखवले आहे. जेव्हा आमचा साखरपुडा झाला तेव्हा लोक म्हणायचे कोणत्या काकूंसोबत लग्न केले.' त्या पुढे म्हणाल्या मी सिनेमातील प्रत्येक गोष्ट आवडली. मुलांनीही मस्त काम केले आहे. मी माझ्या अनेक ग्रूपवर मेसेजही केला की हा चित्रपट नक्की बघा.

डबल एक्सएल सिनेमातून सोनाक्षी सिन्हा मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षकांसमोर येत आहे. तर हुमा कुरेशीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले यश मिळवले आहे. स्क्रीप्ट मध्ये वजन आहे, अशी प्रतिक्रिया सोनाक्षी सिन्हाने सिनेमाबद्दल बोलताना दिली आहे.

Web Title: Romi bhatia says, I saw myself in the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.