कोरोना काळात बिग बी, अक्षय कुमार अन् करण जोहरने केली मदत, रोनित रॉयचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 09:51 AM2023-12-11T09:51:36+5:302023-12-11T09:52:29+5:30
कोणतीही सेवा न घेता कलाकारांनी त्याचे पैसे भरले.
टीव्ही अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) मनोरंजनविश्वातील मोठं नाव आहे. 'कसोटी जिंदगी की' मालिकेमुळे रोनितला अनेक जण ओळखतात. रोनितची स्वत:ची एक सिक्युरिटी एजन्सी आहे. कोव्हिडच्या काळात रोनितलाही आर्थिक अडचणी आल्या. कारण त्याचा बिझनेस ठप्प झाला होता. हाताखाली 130 कर्मचारी होते त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. रोनितने नुकताच खुलासा करत सांगितले की, अशा संकटकाळी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि करण जोहर कोणतीही सुरक्षा सेवा नसतानाही पैसै भरत होते.
रोनित रॉयने 2000 साली आमिर खानच्या 'लगान' सिनेमावेळी सिक्युरिटी एजन्सी सुरु केली होती. आज फिल्मइंडस्ट्रीत तो अनेकांना सुरक्षा पुरवतो. मात्र कोरोना काळात त्यालाही फटका बसला. तो बिकट आर्थिक परिस्थितीतून जात होता. नुकतंच तो एका मुलाखतीत म्हणाला, 'कोरोनाच्या आधी काही महिने मी फारसं काम करत नव्हतो. माझ्याकडे १३० कर्मचारी होते. त्यांचं कुटुंब होतं. सर्वांना पगार देण्याचा आम्ही निर्णय घेतला. मी पाहिलं घरात अनेक बिनकामाच्या गोष्टी पडून होत्या. काही गाड्याही होत्या ज्या आम्ही वापरत नव्हतो.'
तो पुढे म्हणाला, 'माझ्याकडे एक मिनी कूपर होती जी मी कधीच चालवली नव्हती. म्हणूनच मी ती विकली. आणखी काही लक्झरी गोष्टी होत्या ज्या मी विकल्या आणि त्यातून स्टाफचा पगार दिला. मी हे काही दान म्हणून केलं नाही तर ते माझं कर्तव्यच होतं. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि करण जोहर यांनी कोणतीही सेवा न घेता पैसे भरले त्यामुळे तिथून थोडा दिलासा मिळाला. 130 पैकी 30 जणांची काळजी त्यांनी घेतली.