अभिनेता रामचरणमुळे तीन आठवड्यांसाठी थांबले ‘आरआरआर’चे शूटींग!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:36 PM2019-04-04T13:36:07+5:302019-04-04T13:37:04+5:30
होय, सुमारे ४०० कोटी रूपये खर्चून बनणा-या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे शूटींग तीन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले आहे आणि याला कारण आहे, अभिनेता रामचरण.
‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या आगामी चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, सुमारे ४०० कोटी रूपये खर्चून बनणा-या या चित्रपटाचे शूटींग तीन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले आहे आणि याला कारण आहे, अभिनेता रामचरण.
साऊथ सुपरस्टार चिरंजीवाचा मुलगा रामचरण तेजा यात लीड भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु होते. पण जिममध्ये वर्कआऊट करताना रामचरणच्या पायाच्या टाचेला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी रामचरणला तीन आठवड्यांची विश्रांती सांगितली. त्यामुळे या बिग बजेट सिनेमाचे शूटींग तूर्तास स्थगित करण्यात आले. रामचरण सेटवर परतला की, शूटींग पुन्हा एकदा सुरु होईल.
We regret to mention that #RamCharan confronted a minor ankle injury while working out at the gym, yesterday. The pune schedule has been called off. Back to action in 3 weeks! #RRR
— RRR Movie (@RRRMovie) April 3, 2019
साऊथच्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवणगही प्रमुख भूमिकेत आहेत. ज्युनिअर एनटीआरही यात लीड रोलमध्ये आहे. ब्रिटीश अभिनेत्री डेजी एडगर जोन्स या चित्रपटातून भारतीय चित्रपटांत डेब्यू करणार आहे. आलिया यात रामचरणच्या अपोझिट दिसणार आहे. साहजिकच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
Wishing our Young and Dynamic Seetha Rama Raju, a very Happy Birthday! We wish you a year as energetic and zestful as you! 🔥 #HBDRamCharanpic.twitter.com/k1IUMxL8zV
— RRR Movie (@RRRMovie) March 26, 2019
‘आरआरआर’ हा चित्रपट अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. तामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण १० भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या शूटींगचे पहिले शेड्यूल हैदराबादेत पार पडले. दुसºया शेड्यूलसाठी पुण्यात एक भव्य सेट उभारण्यात आला आहे. पुढील तीन आठवड्यांपर्यंत या सेटवर फार रेलचेल दिसणार नाही. पण रामचरण बरा झाल्यानंतर पुन्हा एकदा या सेटवरची रेलचेल वाढेल. ३० जुलै २०२० रोजी ‘आरआरआर’ रिलीज होणार आहे.