RRR Box Office Collection Day 1: जगभरात RRR सूसाट, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:25 AM2022-03-26T11:25:42+5:302022-03-26T11:27:26+5:30

एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR)आणि राम चरण (Ram Charan)स्टारर चित्रपटाबद्दल आधीच चर्चा होती.

Rrr box office collection day 1 ram charan jr ntr ss rajamouli alia bhatt movie | RRR Box Office Collection Day 1: जगभरात RRR सूसाट, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

RRR Box Office Collection Day 1: जगभरात RRR सूसाट, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

googlenewsNext

RRR Box Office Collection Day 1: एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला  आहे. ज्युनियर एनटीआर  (Jr NTR)आणि राम चरण  (Ram Charan)स्टारर चित्रपटाबद्दल आधीच चर्चा होती. सिनेमाचा पहिल्या दिवसाची कमाईचा आकडा समोर आली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

बॉक्स ऑफिसवर आरआरआरचा दबदबा 
बाहुबलीनंतर एसएस राजामौलीचा आरआरआर लोकांची मने जिंकताना दिसत आहे. सिनेमा पाहून बाहेर पडणारे लोक चित्रपटाचे कौतुक करतायेत. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात बंपर कमाई करताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, RRR ने भारतात पहिल्या दिवशी 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या रिपोर्टनुसार, अमेरिका, कॅनडा आणि यूएसए सारख्या देशांमध्येही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.

ज्युनियर एनटीआर आणि राम चरण दोघेही साऊथचे सुपरस्टार आहेत. याशिवाय राजामौली हे  उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. रमेश बाला यांच्या ट्विटनुसार, या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहून अधिक कमाई केली असून, आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. साऊथव्यतिरिक्त RRR ने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही चांगला व्यवसाय केला आहे.

राजामौली यांच्या चित्रपटाकडून 200 कोटींचा आकडा पार करणे अपेक्षित आहे.यूकेमध्ये या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 2.40 कोटी रुपये होते. आंध्र बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार, बाहुबलीनंतर पहिल्याच दिवशी राजामौलीचा RRR 200 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. 

Web Title: Rrr box office collection day 1 ram charan jr ntr ss rajamouli alia bhatt movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.