RRR Box Office Collection: अखेर ‘RRR’नं 1000 कोटींचा आकडा गाठलाच! जाणून घ्या, 16 व्या दिवशी किती केली कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 05:43 PM2022-04-10T17:43:01+5:302022-04-10T17:43:53+5:30
RRR Box Office Collection Day 16: ‘आरआरआर’ रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत आणि 16 व्या दिवशीही या चित्रपटानं घसघशीत कमाई केली आहे
RRR Box Office Collection Day 16: एस. एस. राजमौलींच्या ‘आरआरआर’ (RRR) या राजमौलींच्या सिनेमाची घोडदौड अद्यापही सुरू आहे. ‘आरआरआर’ रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत आणि 16 व्या दिवशीही या चित्रपटानं घसघशीत कमाई केली आहे. होय, 16 व्या दिवशी या चित्रपटानं 21.68 कोटींची कमाई केली आणि याचसोबत 1000 कोटी कमाईचा टप्पाही पार केला. ‘आरआरआर’ने 16 दिवसांत वर्ल्डवाइड 1003.35 कोटींचा बिझनेस केला आहे. यानंतर 1000 कोटींचा टप्पा गाठणारा ‘आरआरआर’ हा देशातील तिसरा सिनेमा बनला आहे.
#RRR WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) April 10, 2022
CROSSES the Himalayan ₹1000 cr milestone mark.
Week 1 - ₹ 709.36 cr
Week 2 - ₹ 259.88 cr
Week 3
Day 1 - ₹ 12.43 cr
Day 2 - ₹ 21.68 cr
Total - ₹ 1003.35 cr
HISTORICAL feat in Indian Cinema.
‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड मोडणार?
1000 कोटींचा आकडा पार करून ‘आरआरआर’ हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. या यादीत राजमौलींचाच ‘बाहुबली 2’ हा सिनेमा नंबर 1 वर आहे. आमिर खानचा ‘दंगल’ दुसºया क्रमांकावर आहे आणि आता तिसºया क्रमांकावर ‘आरआरआर’ पोहोचला आहे. आता फक्त हा सिनेमा ‘बाहुबली 2’ चा कमाईचा विक्रम मोडतो की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या आठवड्यात तीन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. 13 तारखेला ‘बीस्ट’ हा थलापति विजयचा सिनेमा रिलीज होतोय आणि दुसºयाच दिवशी म्हणजे 14 एप्रिलला सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहिद कपूरचा ‘जर्सी’ असे दोन सिनेमे चित्रपटगृहांत झळकणार आहेत. केजीएफ 2 आणि बीस्ट या दोन सिनेमांची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. अशास्थितीत या सिनेमांना ‘आरआरआर’ कशी टक्कर देतो, ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. केजीएफ 2 मुळे ‘आरआरआर’च्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
#RRR grows yet again on [third] Sat... Should cross ₹ 230 cr today [third Sun]... The journey thereafter depends on how strongly it holds on weekdays, till the new films arrive... [Week 3] Fri 5 cr, Sat 7.50 cr. Total: ₹ 221.09 cr. #India biz. pic.twitter.com/qukMr85LWe
— taran adarsh (@taran_adarsh) April 10, 2022
हिंदी व्हर्जनने कमावले 221 कोटी
‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जननेही धमाकेदार कमाई केली. गेल्या शुक्रवारी या चित्रपटाने 5 कोटी कमाई केली. शनिवारी 7.50 कोटींचा बिझनेस केला. याचसोबत ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनची एकूण कमाई 221.09कोटींवर पोहोचली. रविवारच्या कमाईचे आकडे यायचे आहेत. रविवारच्या कमाईसह हा सिनेमा 230 कोटींचा टप्पा गाठेल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.