RRR Box Office Collection Day 7: फ्लॉवर नहीं फायर...! 7 दिवसांत ‘आरआरआर’नं किती गल्ला जमवला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 12:55 PM2022-04-01T12:55:08+5:302022-04-01T12:58:16+5:30
RRR Box Office Collection Day 7: RRRच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटात अभूतपूर्व कामगिरी करत, नवा विक्रम रचला आहे.
RRR Box Office Collection Day 7 : रामचरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR) , आलिया भट (Alia Bhatt), अजय देवगण (Ajay Devgn) अशी तगडी स्टारकास्ट आणि एस. एस. राजमौलींचं दिग्दर्शन असलेला ‘RRR’ हा सिनेमा चांगलाच गाजतोय. चित्रपटाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटात अभूतपूर्व कामगिरी करत, नवा विक्रम रचला आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमानं वर्ल्डवाईड 709.36 कोटींची कमाई केली. सिनेमाच्या हिंदी व्हर्जननेही केवळ सात दिवसांत 131.50 कोटींचा टप्पा गाळला. कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर अशाच कामगिरीची अपेक्षा होती. भारतीय फिल्म इंडस्ट्री गेल्या दोन वर्षात मेटाकुटीस आली होती. पण ‘आरआरआर’ त्सुनामी बनून आला आणि भारतीय चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देऊन गेला, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही.
काल गुरूवारी सातव्या दिवशी ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने 11.50 कोटींची गल्ला जमवला. तर वर्ल्डवाईड 50 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनने 7 व्या दिचशी 6 कोटी कमावले. गुरुवापर्यंत या चित्रपटाची तेलगुमधील कमाई 290 कोटींवर पोहोचली आहे.
#RRRMovie WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) April 1, 2022
ENTERS ₹700 cr club in just 7 days.
Day 1 - ₹ 257.15 cr
Day 2 - ₹ 114.38 cr
Day 3 - ₹ 118.63 cr
Day 4 - ₹ 72.80 cr
Day 5 - ₹ 58.46 cr
Day 6 - ₹ 50.74 cr
Day 7 - ₹ 37.20 cr
Total - ₹ 709.36 cr
आज शुक्रवारी जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. पण जॉनच्या या सुपर अॅक्शन फिल्ममुळे ‘आरआरआर’ला फार नुकसान होईल, अशी शक्यता कमी आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत ‘आरआरआर’ची चांगलीच हवा आहे आणि ही हवा आणखी काही दिवस तरी कायम राहणार आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ला दिली मात
‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने ‘द काश्मीर फाईल्स’ला देखील मात दिली आहे. पहिल्या आठवड्यात ‘द काश्मीर फाईल्स’ने 95.50 कोटींचा बिझनेस केला होता. याऊलट ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने 7 दिवसांत 131.50 कोटी कमावले आहेत. अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ने पहिल्या आठवड्यात एकूण 120.36 कोटी कमावले होते. ‘आरआरआर’ अक्षयच्या या सिनेमालाही मागे टाकलं आहे.