RRR song Sholay: एस. एस.राजमौलींच्या सिनेमात दिसली शिवरायांची झलक; पाहा, ‘RRR’चं नवं गाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 02:19 PM2022-03-15T14:19:50+5:302022-03-15T14:20:50+5:30
RRR song Sholay: आलिया भट, ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘आरआरआर’ हा सिनेमा येत्या 25 मार्चला तुमच्या आमच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालंय.
आलिया भट, ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा येत्या 25 मार्चला तुमच्या आमच्या भेटीस येतोय. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तूर्तास या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालंय. ‘शोले’ (RRR song Sholay ) असं नाव असलेल्या या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या सेलिब्रेशन अँथम सॉन्गमध्ये रामचरण, ज्युनिअर एनटीआर आणि आलिया भट थिरकताना दिसत आहेत.
Celebrate the magic of Indian Cinema with #RRRMovie from March 25th🔥🌊
— Alia Bhatt (@aliaa08) March 14, 2022
The joyful #RRRCelebrationAnthem, #Sholay is here! 🕺🏻💃🏻🕺🏻
▶️https://t.co/IDp3Px9XiK
गाण्यात तिन्ही कलाकार थोर राष्ट्रपुरूषांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद बोस, सरदार वल्लभभाई पटेल, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग असे अनेक थोर राष्ट्रपुरूषांना या गाण्यात मानवंदना देण्यात आली आहे.
अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘आरआरआर’या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरुची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आलियाने यात राम चरणची पत्नी अल्लुरी सीता हिची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका फार मोठी नाही. या चित्रपटासाठी आलियानं मोजून 10 दिवस शूटींग केलं. पण या 10 दिवसांच्या शूटींगसाठी तगडी रक्कम वसूल केली. या चित्रपटात आलिया केवळ 15 मिनिटांसाठी दिसणार आहे आणि या 15 मिनटांच्या भूमिकेसाठी आलियानं तब्बल 6 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. आलिया राजामौली यांची खूप मोठी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी येताच तिने होकार दिला. अर्थात 6 कोटींच्या बदल्यात. विशेष म्हणजे टॉलिवूडमध्ये एकाही अभिनेत्रीला लीड भूमिका करण्यासाठी इतकी फी मिळत नाही. आलिया बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने तोंडून शब्द काढला आणि आरआरआरच्या मेकर्सनी तो फुलासारखा झेलला, असं म्हणायला हरकत नाही.