Ram Charan Jr Ntr : इतकी ओव्हरॲक्टिंग? रामचरण व ज्युनिअर एनटीआरचं इंग्लिश ऐकून लोकांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:30 PM2023-01-12T14:30:15+5:302023-01-12T14:37:05+5:30

RRR Star Ram Charan Jr Ntr Trolled: सोशल मीडियावर रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांना ट्रोल केलं जात आहे. याला कारण आहे या दोघांची व्हायरल क्लिप.

RRR Star Ram Charan Jr Ntr Trolled For Fake American Accent | Ram Charan Jr Ntr : इतकी ओव्हरॲक्टिंग? रामचरण व ज्युनिअर एनटीआरचं इंग्लिश ऐकून लोकांनी केलं ट्रोल

Ram Charan Jr Ntr : इतकी ओव्हरॲक्टिंग? रामचरण व ज्युनिअर एनटीआरचं इंग्लिश ऐकून लोकांनी केलं ट्रोल

googlenewsNext

RRR Star Ram Charan Jr Ntr Trolled : एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. सध्या संपूर्ण देश या विजयाचा आनंद साजरा करत आहे. साहजिकच यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांचंही योगदान आहे. त्यांचंही कौतुक होत आहे. पण सोशल मीडियावर मात्र रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांना ट्रोल केलं जात आहे. याला कारण आहे या दोघांची व्हायरल क्लिप.

तुम्हाला ठाऊक आहेच की, ऑस्करनं (Oscars 2023) जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये आरआरआर या चित्रपटाचा देखील समावेश आहे. त्यामुळे रामचरण व ज्युनिअर एनटीआर सध्या अमेरिकेत आरआरआर प्रमोट करत आहेत. अलीकडे अमेरिकेत या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं. यानंतर रामचरण, ज्युनिअर एनटीआर यांनी मीडियाला मुलाखत दिली. याच मुलाखतीची एक क्लीप सध्या व्हायरल होतेय. याच क्लीपमुळे दोघंही ट्रोल होत आहेत.

मुलाखतीत अमेरिकी पत्रकार रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांना प्रश्न विचारतात आणि दोघंही अमेरिकन इंग्लिशमध्ये उत्तर देतात. मुळात रामचरण व ज्युनिअर एनटीआरचं हे बोलणंच चाहत्यांना खटकलं. यावरून दोघांना ट्रोल केलं जात आहेत. रामचरण व ज्युनिअर एनटीआर इतकी ओव्हरॲक्टींग का करत आहेत?, असं एका युजरने म्हटलं आहे.

दोघांनीही कदाचित एकाच ठिकाणी स्पीकिंग क्लास लावला असावा, अशा शब्दांत एका युजरने दोघांची खिल्ली उडवली आहे. रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांनी  प्रियंका चोप्राचा फेक कोचिंग क्लास ज्वॉईन केला की काय?, अशी कमेंट करत एका युजरने दोघांची मजा घेतली आहे.

रामचरण व ज्युनिअर एनटीआर‘आरआरआर’ हा सिनेमा गेल्या वर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात नाटू नाटू गाण्यावर दाेघांनी जबरदस्त डान्स केला आहे. या चित्रपटातील वीएफएक्स, चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत सामील झाला आहे.  एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

Web Title: RRR Star Ram Charan Jr Ntr Trolled For Fake American Accent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.