RRRच्या यशानंतर राम चरणची वाढली प्रचंड लोकप्रियता, आता करणार हॉलिवूडमध्ये धमाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 19:09 IST2023-03-09T19:04:53+5:302023-03-09T19:09:32+5:30
साऊथ सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) ‘RRR’ या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं जबरदस्त कौतुक झालं.

RRRच्या यशानंतर राम चरणची वाढली प्रचंड लोकप्रियता, आता करणार हॉलिवूडमध्ये धमाका
Ram Charan Hollywood Debut: साऊथ सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) ‘RRR’ या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं जबरदस्त कौतुक झालं. चित्रपटातील कलाकारांच्या अदाकारीचं केवळ देशातील समीक्षकांनीच नाही तर हॉलिवूडनेही दाद दिली. आता राम चरण लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पॉडकास्ट सॅम फ्रेगासोसोबतच्या अलीकडच्या संभाषणात, राम चरणने खुलासा केला की तो हॉलीवूडच्या प्रोजेक्टसाठी चर्चेत आहे.
हॉलिवूडसाठी तयार आहे राम चरण
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, टॉलिवूड अभिनेत्याने असेही सांगितले आहे की काही महिन्यांत त्याच्या हॉलिवूड प्रोजेक्टची अधिकृत घोषणा केली जाईल. याशिवाय अभिनेत्याने असेही सांगितले की त्याला ज्युलिया रॉबर्ट्स, टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांसारख्या हॉलीवूडच्या दिग्गजांसह काम करायचे आहे.
राम चरण सध्या अमेरिकेत होणाऱ्या ऑस्कर 2023 साठी त्याच्या 'RRR' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे ऑस्कर 2023 साठी नामांकन मिळाले आहे. गुड मॉर्निंग अमेरिका आणि क्लटा एंटरटेनमेंट या दोन लोकप्रिय हॉलिवूड टॉक शोमध्ये अभिनेता अलीकडेच त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. याशिवाय 'आरआरआर'च्या निर्मात्यांनी एक खास स्क्रीनिंगही आयोजित केले होते.