"अक्षय कुमारचा चित्रपट ४० दिवसांत बनतो, पण RRR च्या एक सीनसाठी ३० दिवस लागले"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:27 PM2022-11-14T16:27:28+5:302022-11-14T16:30:01+5:30

हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समीटमध्ये राम चरणने अभिनेता अक्षय कुमारशी संवाद साधला.

"RRR takes 30 days to shoot a scene and Akshay Kumar's film takes 40 days." | "अक्षय कुमारचा चित्रपट ४० दिवसांत बनतो, पण RRR च्या एक सीनसाठी ३० दिवस लागले"

"अक्षय कुमारचा चित्रपट ४० दिवसांत बनतो, पण RRR च्या एक सीनसाठी ३० दिवस लागले"

googlenewsNext

दाक्षिणात्य स्टारकास्ट असलेला सिनेमा RRR ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित होताच, मोठी चर्चाही याची सुरू झाली. चित्रपटातील सीन विशेषत: लक्षणीय होते. अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि अभिनेता रामचरण यांनी साकारलेल्या भूमिकेचही खुप कौतुक झालं. यंदाच्या वर्षात पुष्पा आणि RRR सिनेमानं बॉक्स ऑफिससह सिनेमासृष्टी गाजवली. त्यामुळेच, या दाक्षिणात्य सिनेमांची बॉलिवूडमध्येही चर्चा रंगली. बॉलिवूड अभिनेतेही या सिनेमांवर चर्चा करू लागले. त्यातच, आता अभिनेता रामचरण याने चित्रपटाच्या दर्जाबाबत भाष्य करताना, अभिनेता अक्षयकुमारला टोला लगावला. 

हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समीटमध्ये राम चरणने अभिनेता अक्षय कुमारशी संवाद साधला. त्यावेळी, अक्षयच्या कामाबद्दल बोलताना त्याने कौतुक केलं. अक्षय कुमार ४० दिवसांत एखादा चित्रपट करतात, असे रामचरणने म्हटले. मात्र, त्यासोबत, आरआरआर सिनेमातील एका सीनसाठी तब्बल ३५ दिवस लागल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे, अक्षयचे त्याने कौतुक केली की टोला लगावला, याची चर्चाच सोशल मीडिया आणि बॉलिवूडमध्ये रंगली आहे. 

आपला चित्रपट हा भारतीय चित्रपट आहे आणि तो आता राज्यांच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार गेला आहे याचा अभिमान असल्याचंही राम चरणने स्पष्ट केलं. एक अभिनेता म्हणून राम चरण पुढे म्हणाला, “आम्हाला आमच्या चाहत्यांकडून मिळणारं प्रेम पाहून भरून येतं. स्टारडम ही एक सर्वात मोठी जबाबदारी आहे एक अभिनेता म्हणून ती जबाबदारी पेलता यायलाच हवी.”. त्यामुळे, आपणही सिनेमांमध्ये सर्वोतोपरी काळानुरुप बदल करायला हवेत, असे राम चरणने म्हटले. 

“काही चित्रपट हे ४० दिवसांत पूर्ण होतात, अक्षय कुमार त्यांचे चित्रपट या कालावधीत पूर्ण करतात. पण काही चित्रपटांसाठी जास्त काळ लागू शकतो. ‘आरआरआर’मधील ओपनिंग शॉटसाठी आम्ही ३५ दिवस ३००० ते ४००० लोक सलग काम करत होतो. लहानपणापासूनच मला धुळीची प्रचंड अॅलर्जी आहे. माझी लहानपणी सायनसचि सर्जरीदेखील झाली आहे, पण माझं नशीब बघा याच धुळीत मला ३५ दिवस काम करावं लागतंय.”

अक्षय ४०-४५ दिवसांत सिनेमा संपवतो

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे (Akshay Kumar ) सिनेमे दणकून आपटत आहेत. या वर्षात रिलीज झालेले त्याचे सलग चार सिनेमे फ्लॉप गेलेत. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन या अक्कीच्या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ‘राम सेतू’ हा सिनेमाही फ्लॉपच्याच रांगेत जाऊन बसला. अगदी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘कठपुतली’ हा सिनेमाही लोकांना फार काही आवडला नाही. अक्षय कुमारने आता ‘मंथन’ करण्याची गरज असल्याचं अनेकांचं मत पडलं आहे. अक्षय धडाधड सिनेमे साईन करतो, 40-45 दिवसांत अक्षय सिनेमो हातावेगळा करतो, त्याच्या या कामाच्या पद्धतीवरही टीका होऊ लागली आहे. अलीकडे बोनी कपूर यांनी अक्षयला यावरून जोरदार टोला लगावला होता.
 

 

Web Title: "RRR takes 30 days to shoot a scene and Akshay Kumar's film takes 40 days."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.