का रडली महिरा खान भर कार्यक्रमात?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 10:46 AM2016-11-25T10:46:43+5:302016-11-25T11:29:36+5:30
‘रईस’ चित्रपटाद्वारे किंग खान शाहरुखसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असलेली पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान एका कार्यक्रमात सर्वांसमक्ष स्टेजवर मुसुमुसू ...
‘रईस’ चित्रपटाद्वारे किंग खान शाहरुखसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असलेली पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान एका कार्यक्रमात सर्वांसमक्ष स्टेजवर मुसुमुसू रडली. आता तिला रडायला काय झाले? असा प्रश्न आणि उत्सुकता तुमच्या मनात जागणे स्वभाविक आहे.
तर झाले असे की, एका कार्यक्रमात महिरा तिच्या करिअरविषयी बोलत असताना म्हणाली की, ‘मी जेव्हा आईला सांगितले की मी शाहरुखबरोबर एका चित्रपटात काम करत आहे तेव्हा तिचा विश्वासच बसला नाही. मी तिची मस्करीच करतेय असे तिला वाटले. नंतर मग खात्री पटल्यावर तर ती ढसाढसा रडूच लागली.’ हे सांगताना महिराने स्टेजवर आईच्या रडण्याची नक्कल करून दाखवली.
यावर तर मग एकच हशा पिकला. ‘मला असे करताना पाहून आता माझाी आई काही मला सोडणार नाही’ अशी गंमतीशीर टिप्पणीदेखील तिने जोडली. विविध पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम केलेली महिरा ‘रईस’मध्ये मोहसिना नावाचे पात्र साकारत आहे. दारू बंदी असलेल्या गुजरात राज्यात शाहरुख दारू तस्करांचा म्होरक्या म्हणून दिसणार आहे तर नवाजुद्दीन सिद्दिकी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.
#mahirakhan "oh my god,My mother will kill me"
Mahira's mom reaction when told her she'd signed a film opposite @iamsrk #3DaysToDearZindagi pic.twitter.com/m2mbJaQG5y— SRK EGYPT FAN CLUB ™ (@SRKEGYPTFC) 22 November 2016
मध्यंतरी उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर हिंदी चित्रपटात काम करण्यास बंदी घालण्याचा निर्णय निर्मात्यांच्या संघटनेने घेतला होता. ‘मनसे’ने पाकिस्तानी कलाकार असलेला कोणताच चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यास विरोध केला होता. त्यामुळे फवाद खान स्टारर ‘ऐ दिल है मुश्किल’ चांगलाच ‘मुश्किल’मध्ये सापडला होता.
रईस देशात पसरलेली संतप्त लाट पाहता महिराचेही बॉलीवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. चित्रपटाचा निर्माता फरहान अख्तरने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयावर टीका केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ‘ऐ दिल...’ प्रदर्शित होण्यासाठी ‘मनसे’च्या अटी मान्य करण्यावरूनही त्याने चांगलेच तोंड सुख घेतले होते. यावर ‘तुझा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी पाहून घेऊ’ असा ‘मनसे’तर्फे इशारा देण्यात आला होता. पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी ‘रईस’ प्रदर्शित होत आहे.