‘रूहअफ्जा’चे शूटिंग पूर्ण; जान्हवी कपूरने शेअर केला फोटो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 19:12 IST2019-09-15T19:11:26+5:302019-09-15T19:12:40+5:30
अभिनेता राजकुमार राव आणि गॉर्जिअस अभिनेत्री जान्हवी कपूर ही फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. कारण नुकताच जान्हवी कपूरने हॉरर कॉमेडी असलेल्या ‘रूहअफ्जा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याचा फोटो शेअर केला आहे.

‘रूहअफ्जा’चे शूटिंग पूर्ण; जान्हवी कपूरने शेअर केला फोटो...
हॅण्डसम अभिनेता राजकुमार राव आणि गॉर्जिअस अभिनेत्री जान्हवी कपूर ही फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. कारण नुकताच जान्हवी कपूरने हॉरर कॉमेडी असलेल्या ‘रूहअफ्जा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यावरूनच चित्रपटाचे रॅप अप झाल्याचे समजतेय. राजकुमार आणि जान्हवी प्रथमच एकमेकांसोबत काम करत असल्याचे समजतेय.
‘रूहअफ्जा’ चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूल अगोदरपासूनच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे स्टारकास्टही दमदार असून चाहत्यांचे सर्व लक्ष राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्याकडे असेल यात काही शंका नाही. जान्हवी कपूरने सोशल मीडियावर या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी रॅप अपचा फोटो शेअर करून सांगितली आहे. या चित्रपटाचे शूटिंग रूरकी, मनाली आणि आग्रा येथे करण्यात आली आहे.
या चित्रपटात वरूण शर्मा, पंकज त्रिपाठी, अम्मा शरीफ आणि रोनित रॉय हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २० मार्च रोजी चित्रपट रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.