अंकल जी...! हृतिकच्या गर्लफ्रेंडला कामाची काय गरज? म्हणणाऱ्या ट्रोलरला सबा आजादचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:27 IST2025-02-11T16:26:22+5:302025-02-11T16:27:17+5:30
सबा आजादने दिलं रोखठोक उत्तर

अंकल जी...! हृतिकच्या गर्लफ्रेंडला कामाची काय गरज? म्हणणाऱ्या ट्रोलरला सबा आजादचं उत्तर
'ग्रीक गॉड' अशी ओळख असलेला हँडसम अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. सुझैन खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर हृतिकच्या आयुष्यात सबा आजादची (Saba Azad) एन्ट्री झाली. सबा आजाद अभिनेत्री, गायिकाही आहे. हृतिक वयाने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठा आहे. सध्या सबाला हतिकची गर्लफ्रेंड म्हणून काही अडचणींचा सामनाही करावा लागत आहे.
सबाने काही महिन्यांपूर्वी स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला होता. नेहमी व्हॉइस ओव्हर देत असलेल्या एका कंपनीने तिला ऑफर देणंच बंद केलं. हतिकची गर्लफ्रेंड असल्याने आता सबा हे काम करणार नाही असं कंपनीला वाटलं. सबाने अशा विचारांची निंदा केली होती. आता पुन्हा एकदा तिला अशाच एका कमेंटचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी सबाने 'हू इज युअर गायनॅक' या तिच्या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर शेअर केला. यावर एकाने कमेंट करत लिहिले, 'मला वाटलं की सीझन २ कधीच येणार नाही, शेवटी सबा मॅडम ग्रीक गॉडची गर्लफ्रेंड आहे. पण आता मी या पुढील सीझनसाठी खूप उत्साहित आहे'.
सबाने या कमेंटचा स्क्रीनशॉट स्टोरीवर शेअर करत लिहिले, "ओके सुमित जी अंकल जी! कदाचित तुमच्या जगात जे प्रेमात पडतात ते अकार्यक्षम होत असतील, तुमच्या घराचा मालक भाडं मागणं बंद करत असेल आणि कोणाची आपल्या टेबलवर जेवण आणून ठेवण्याची गरज जादुईरित्या संपत असेल,वाह!"
सबा आजाद एका म्युझिक बँडमध्येही आहे. इमाद शाहसोबत ती परफॉर्म करते. सध्या ती हृतिकसोबत त्याच्या घरी फंक्शन्समध्येही दिसते तर कधी त्याच्या एक्सवाईफसोबतही हँगआऊटही करत असते.