सबा आजादच्या साडीतल्या फोटोंनी घेतली हृतिक रोशनची विकेट, अभिनेत्याने असं केलं रिअ‍ॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:50 PM2023-03-25T17:50:37+5:302023-03-25T17:51:15+5:30

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आजाद (Saba Azad) रिलेशनशीपमुळे सतत चर्चेत येत असतात.

Saba Azad's saree photos take Hrithik Roshan's wicket, actor reacts | सबा आजादच्या साडीतल्या फोटोंनी घेतली हृतिक रोशनची विकेट, अभिनेत्याने असं केलं रिअ‍ॅक्ट

सबा आजादच्या साडीतल्या फोटोंनी घेतली हृतिक रोशनची विकेट, अभिनेत्याने असं केलं रिअ‍ॅक्ट

googlenewsNext

बॉलिवूडमधील अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आजाद (Saba Azad) यांच्या अफेअरच्या बातम्या सतत येत असतात. हे दोघे एकत्र दिसले असले आणि एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत असले तरी हृतिक रोशन आणि सबा आजाद यांनी अद्याप त्यांच्या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या सबा आजादने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे साडीचे फोटो शेअर केले आहेत ज्यावर हृतिक रोशनने कमेंट केली आहे.

सबा आजादने शनिवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे तीन फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती सिल्व्हर साडी आणि त्याच रंगाचा ब्लाउज परिधान केलेला दिसत आहे. सबा आजादने तिन्ही चित्रांमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. सबा आजादचे मोकळे केस तिचे सौंदर्य खुलवत आहेत. त्याचवेळी हृतिक रोशन त्याच्या कथित गर्लफ्रेंडच्या साडीतील फोटोंकडे आकर्षित झाला आणि त्याने कमेंट केली. सबा आझादच्या फोटोंवर कमेंट करताना हृतिक रोशनने लिहिले, 'चल भेटूया.' यासोबतच रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे.


हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो शेवटचा 'विक्रम वेधा' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान आणि राधिका आपटेही होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. आता हृतिक रोशन अनिल कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत 'फायटर' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबर हृतिक रोशनच्या 'वॉर २' आणि 'क्रिश ४' या चित्रपटांचीही चर्चा आहे.

Web Title: Saba Azad's saree photos take Hrithik Roshan's wicket, actor reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.