किंगफिशर व्हिला खरेदी करणारा अभिनेता सचिन जोशीला अटक, हैद्राबाद पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 10:11 AM2020-10-14T10:11:41+5:302020-10-14T10:13:29+5:30
सचिन जोशीने २०११ मध्ये 'अजान' या हिंदी सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्याला सोमवारी रात्री मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली. त्याला हैद्राबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
'जॅकपॉट' सिनेमाचा अभिनेता सचिन जोशी याला मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार, सचिन जोशीने २०११ मध्ये 'अजान' या हिंदी सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्याला सोमवारी रात्री मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली. त्याला हैद्राबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो दुबईहून परत येत होता. त्याच्या जवळच्या व्यक्तीने माहिती दिली की, हैद्राबाद पोलीसांनी अटक केल्यावर त्याला लगेच हैद्राबादला नेण्यात आले. सचिनला कोणत्या केसमध्ये अटक केली गेली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण असे साऊथ सिने इंडस्ट्रीतील ड्रग्स केस प्रकरणी त्याला अटक झाल्याची चर्चा होत आहे.
सचिन जोशी हे इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. काही सिनेमांची त्याने निर्मितीही केली आहे. अनेक तेलुगू सिनेमातही त्याने काम केलं आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात २००२ मध्ये तेलुगू सिनेमा Mounamelanoyi तून केली होती.
सचिन जोशी हा गुटखा किंग जगदीश जोशीचा मुलगा आहे. त्यांचं नाव सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्येही आहे. सीबीआयच्या चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे की, जगदीश जोशी आणि माणिकचंद गुटखा बनवणारे रसिकलाल धारीवाल यांना त्यांचं प्रकरण सोडवण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची मदत घेतली होती.
सचिन जोशी याआधीही अनेकदा चर्चेत होता. २०१७ मध्ये त्याने बॅंक लिलावात विजय माल्याचा गोव्यातील किंगफिशर व्हिला ७३ कोटी रूपयांना खरेदी केला होता. सचिन हा जॅकपॉट सिनेमात सनी लिओनीसोबत दिसला होता. त्यांच्या सीन्सची चर्चाही रंगली होती. तसेच सचिनने मॉडल-अभिनेत्री उर्वशी शर्मासोबत २०१२ मध्ये लग्न केलं.