लोक सेव्हिंग का करत नाहीत?  सविता बजाज यांच्या स्थितीवर सचिन पिळगावकर यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 05:01 PM2021-07-18T17:01:52+5:302021-07-18T17:02:37+5:30

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सविता बजाज यांनी आपल्यावर आलेल्या आर्थिक संकटाचा खुलासा केला होता.

sachin pilgaonkar reacts to nadiya ke paar co-star savita bajaj financial condition | लोक सेव्हिंग का करत नाहीत?  सविता बजाज यांच्या स्थितीवर सचिन पिळगावकर यांची प्रतिक्रिया

लोक सेव्हिंग का करत नाहीत?  सविता बजाज यांच्या स्थितीवर सचिन पिळगावकर यांची प्रतिक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देसविता बजाज यांनी अभिनेता सचिन पिळगांवकरांसोबत ‘नदीया के पार’ चित्रपटात काम केलं होतं.

सचिन पिळगावकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘नदीया के पार’ (Nadiya Ke Paar) या चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री सविता बजाज (Savita Bajaj)गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. एका ताज्या मुलाखतीत सविता बजाज यांनी आर्थिक संकटाबद्दल सांगितले होते. आता सविता यांच्या या आर्थिक परिस्थितीवर सचिन पिळगावकर (Sachin Pilgoankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सचिन?
वृत्तपत्रात की सविताजींबद्दल वाचले. त्यांच्या मदतीसाठी असोसिएशनच्या लोकांनी पुढे यावे असे मला वाटते. तुम्ही  IMPPA वा CINTAA वा  कडे मदत मागिल्यास नक्की मदत मिळते. तुम्ही या संस्थांचे सदस्य असणे यासाठी गरजेचं नाही, असं ‘इंडिया टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाले. सिन्टानं सविता यांना मदत केल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर सचिन पुढे म्हणाले की, बघा यात दोन गोष्टी असू शकतात. एकतर सिन्टापर्यंत अजून गोष्ट पोहोचली नसावी किंवा मग त्यांना दिलेली मदत अपुरी असावी. पण लोक सेविंग्स का ठेवत नाहीत? दुस-याकडं बोट दाखवणं सोपं आहे. पण हे करताना बाकीची चार बोटं आपल्याकडे आहेत, हे लोक विसरतात. मी कोणत्याही कलाकारावर आरोप लावू इच्छित नाही. आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं, हे मला माहित आहे. म्हणूनच बचत खूप महत्त्वाची आहे. सेव्हिंग असलीच पाहिजे. कोणत्याही कलाकाराच्या करिअरचा काहीही भरोसा नाही. आज करिअर आहे उद्या नाही. अशास्थिीत पैसे वाचवणं गरजेचं आहे.’

Web Title: sachin pilgaonkar reacts to nadiya ke paar co-star savita bajaj financial condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.