Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:53 IST2024-12-06T11:43:11+5:302024-12-06T11:53:17+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची उपस्थिती होती.

Sachin Tendulkar and Shah Rukh Khan meet at Maharashtra CM oath ceremony | Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट!

Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी सांयकाळी (५ डिसेंबर) शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदान याठिकाणी हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याकरता नेत्यासोबत सिनेविश्व आणि क्रिकेट विश्वातील दिग्ग्ज उपस्थित होते. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनीही शपथविधी समारंभासाठी हजेरी लावली होती, त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

शाहरुख आणि सचिन तेंडुलकर दोघेही फडणवीसांच्या शपथविधीसाठी उपस्थित होते. व्हिडीओमध्ये दिसते की,  समोरासमोर येताच दोघांनीही गळाभेट घेतली. त्यांच्यामध्ये अगदी काही सेकंदाचेच संभाषण होते आणि ते त्यांच्या आसनव्यवस्थेकडे वळतात. आसनस्थ झाल्यावर ते गप्पा मारताना दिसून येत आहेत. यावेळी शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा दादलानीही दिसून आली. तर सचिनसोबत पत्नी अंजली तेंडुलकरही होती. शाहरुखन अंजलीचीही भेट घेतली. 


राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  यापूर्वी 2014 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर 2019 मध्ये ते काही दिवस मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ते उपमुख्यमंत्री झाले. आता मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली.
 

Web Title: Sachin Tendulkar and Shah Rukh Khan meet at Maharashtra CM oath ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.