अन् लेकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे सचिन ओशाळला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खजील झाला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 06:36 PM2021-04-25T18:36:48+5:302021-04-25T18:42:21+5:30

‘बिग बीं’च्या 75व्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने सर्वांना हा किस्सा सांगितला होता. वाचा ‘तो’ मजेदार किस्सा

sachin tendulkar was embarrassed in front of amitabh bachchan because of son arjun | अन् लेकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे सचिन ओशाळला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खजील झाला...!

अन् लेकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे सचिन ओशाळला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खजील झाला...!

googlenewsNext
ठळक मुद्देसचिनचा चिमुकला अर्जुन आता 21 वर्षांचा झाला आहे आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट खेळतोय.

सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) कालच त्याचा वाढदिवस साजरा केला. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिनने आपल्या 24 वर्षांच्या करिअरमध्ये नाव, पैसा, ग्लॅमर सगळे काही कमावले. याच सचिनला एकदा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यापुढे लाजीरवाण्या स्थितीचा सामना करावा लागला होता. खुद्द सचिनने अमिताभ यांच्या 75 व्या वाढदिवसाला हा किस्सा सांगितला होता. ( when Sachin Tendulkar  faces embracement in front of Amitabh Bachchan).

सचिनने मीडियासोबत हा काहीसा मजेदार किस्सा शेअर केला होता. तर झाले असे की, सचिन व अमिताभ एका जाहिरातीच्या शूटच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यादिवशी शूटवर सचिनची पत्नी अंजली दीड वर्षाच्या चिमुकल्या अर्जुनला  (Arjun Tendulkar)  घेऊन आली होती. ब्रेकमध्ये अमिताभ व सचिन दोघेही अर्जुनसोबत खेळत होते. मज्जा-मस्ती सुरु होती. 

अर्जुन सचिनच्या मांडीवर बसून मस्तपैकी अर्जुन संत्री खात होता.  तर अमिताभ या बापलेकांना खेटून बसत चिमुकल्या अर्जुनच्या बाललीला बघत होते. संत्री खाऊन झाल्यावर  अर्जुनचे हात खराब झालेत. चिमुकल्या अर्जुनने काय केले तर अमिताभ बच्चन यांच्या कुर्त्याला हात पुसलेत. अर्जुन चक्क महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुर्त्याला हात पुसताना पाहून सचिन इतका ओशाळला की, त्याला काही सुचेना. कुठे बघू, काय करू, असे त्याला झाले होते. पण अमिताभ मात्र शांतपणे हसत होते. अर्जुनचे हे खोडकर कृत्य पाहून त्यांना हसू आवरत नव्हते.
सचिनला अर्जुनचा तो किस्सा आजही आठवतो. आज त्याला तो किस्सा आठवला की, हसू येतं. पण त्यावेळी ती स्थिती त्याच्यासाठी चांगलीच लाजिरवाणी होती. सचिनचा चिमुकला अर्जुन आता 21 वर्षांचा झाला आहे आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट खेळतोय.

Web Title: sachin tendulkar was embarrassed in front of amitabh bachchan because of son arjun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.