'त्याने पँट उतरवली आणि...' वयाच्या १७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला लैंगिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 04:18 PM2022-06-06T16:18:01+5:302022-06-06T18:37:32+5:30
Kubbra sait: कुब्राच्या घरची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना एका व्यक्तीने तिच्या कुटुंबीयांनी मदत केली होती.
'सेक्रेड गेम्स' (Sacred Games) या गाजलेल्या वेब सीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे कुब्रा सैत (Kubbra Sait). या सीरिजमध्ये तिने केलेल्या कामाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. सध्या कुब्रा तिच्या पुस्तकामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच कुब्राचं Open Book: Not quite a Memoir हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात तिने लहानपणापासून तिला कशाप्रकारे लैंगिक अत्याचार आणि शोषण सहन करावं लागलं याविषयी भाष्य केलं आहे. यात वयाच्या १७ व्या वर्षीच तिला लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागलं होतं असं तिने यात नमूद केलं आहे.
कुब्राच्या घरची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना एका व्यक्तीने तिच्या कुटुंबीयांनी मदत केली होती. या व्यक्तीला कुब्रा काका म्हणायची. परंतु, याच व्यक्तीने परिस्थितीचा फायदा घेत जवळपास दीड वर्ष कुब्राचा लैंगिक छळ केला.
"मी लहान असताना माझ्या घरची परिस्थिती ढासळली होती. अनेक आर्थिक संकंट होती. या काळात एक व्यक्ती आम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये भेटला होता. पुढे हळूहळू या व्यक्तीने माझ्या घरातल्याशी ओळख वाढवली व वारंवार घरी येऊ लागला. एकदा आई-वडिलांचं खूप कडाक्याचं भांडण झालं होतं. माझी आई मोठमोठ्याने रडत होती आणि वडील घऱ सोडून जायची धमकी देत होते. त्यावेळी मी या काकांना फोन करुन त्यांची मदत मागितली होती. पण त्यांनी या मदतीच्या बदल्यात मला शारीरिक त्रास दिला", असं कुब्राने तिच्या पुस्तकात म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "या व्यक्तीने मला एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याचे घाणेरडे चाळे सुरु झाले. त्यावेळी मला जोरात ओरडून लोकांना गोळा करावसं वाटत होतं. पण, मी काहीच करु शकत नव्हते. त्या व्यक्तीने नंतर त्याची पँट उतरवली. त्याची ही कृती पाहून मी प्रचंड घाबरले होते. मी माझी व्हर्जिनिटी गमावत असल्याचं मला कळत होतं. तो एक विवाहित पुरुष होता. इतकंच नाही तर त्याला एक मूलदेखील होतं. जवळपास दीड वर्ष तो माझं शोषण करत राहिला."
दरम्यान, लहान वयात हा अत्याचार सहन केल्यानंतर काही वर्षांनी कुब्राने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. मात्र, कुब्राचं म्हणणं ऐकल्यानंतर आईला रडू कोसळलं आणि तिने हात जोडून लेकीची माफी मागितली. परंतु, तिच्यासोबत जे घडलं ते कधीच विसरणं शक्य नाही असंही कुब्राने या पुस्तकात म्हटलं आहे.