/>जागरण फिल्म फेस्टिवलचे हे यंदाचे ७ वर्ष असून
या फिल्म फेस्टिवलमध्ये देश विदेशातील अनेक भाषेतील ३००० उत्कृष्ट चित्रपट शामिल झाले आहेत. या चित्रपटांच्या यादीत मराठी चित्रपटांनी ही आपले स्थान मिळवले आहे. जागरण फिल्म फेस्टिवलमध्ये स्थान मिळवून सैराट आणि नटसम्राटने मराठी चित्रपट चित्रपटांचा मान आणि शान आणखीच वाढवली आहे.
या फेस्टिवलमुळे मराठी चित्रपट देशांतर्गत सर्व विविध भाषेतील प्रेक्षकांना पाहण्याची संधी तर मिळेलच पण मराठीचा चाहता वर्गही वाढेल.
दिल्ली मध्ये १ जुलै पासून सुरु होत असलेल्या जागरण फिल्म फेस्टिवलमध्ये २ जुलैला सैराट आणि ३ जुलैला नटसम्राट दाखवला जाईल
या चित्रपटांना पाहण्यासाठी दिल्लीचे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
७ वा जागरण फिल्म फेस्टिव्हल १ जुलै पासून नवी दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरियममध्ये सुरु होत असून १६ शहर फिरून अंतिम फेरीसाठी सप्टेंबर २६ ला मुंबईत पोहोचेल.
Web Title: Sagar, Natsarram in Jagaran Film Festival
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.