सागरिका घाटगेने बेडवरूनच शेअर केला ‘हा’ फोटो; युजरच्या कॉमेण्टला, ‘हा प्रश्न तुझ्या बहिणीला विचार’ असे दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 10:36 AM2017-12-09T10:36:31+5:302017-12-09T16:06:59+5:30

सागरिका घाटगे आणि जहीर खान हे नवदाम्पत्य सध्या हनिमूनसाठी मालदीवला असून, या रोमॅण्टिक क्षणांचे काही फोटोज् ते सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. वाचा सविस्तर!

Sagarika Ghatge shared 'Haj' photo from bed; Reply to the user's comet, 'Think this question to your sister!' | सागरिका घाटगेने बेडवरूनच शेअर केला ‘हा’ फोटो; युजरच्या कॉमेण्टला, ‘हा प्रश्न तुझ्या बहिणीला विचार’ असे दिले उत्तर!

सागरिका घाटगेने बेडवरूनच शेअर केला ‘हा’ फोटो; युजरच्या कॉमेण्टला, ‘हा प्रश्न तुझ्या बहिणीला विचार’ असे दिले उत्तर!

googlenewsNext
ही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकलेला क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या त्यांचा हनिमून एन्जॉय करीत आहेत. आयुष्यातील खूपच रोमॅण्टिक क्षण अनुभवण्यासाठी हे कपल सध्या मालदीव येथे आहे. हनिमूनच्या पहिल्या दिवसापासूनच सागरिका आणि जहीर त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. आता आणखी एक नवा फोटो शेअर केल्याने हे दोघे चांगलेच चर्चेत आले आहेत. या फोटोमुळे सागरिका सोशल मीडियावर ट्रोल होत असून, युजर्सकडून अतिशय अश्लील स्वरूपाच्या कॉमेण्ट तिच्या फोटोला दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे सागरिकानेदेखील युजर्सला जशास तसे उत्तर दिल्याने हा वाद चांगलाच चिघळला आहे. 



त्याचे झाले असे की ‘चक दे इंडिया’ स्टार सागरिकाने शनिवारच्या सकाळी तिच्या इन्स्टाग्राम रूमबाहेरील दृश्य असलेला खूपच सुंदर फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तिच्या रूमबाहेरील समुद्रकिनारा दिसत आहे. सागरिकाने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सकाळचा नयनरम्य प्रकाश’. सागरिकाने हा फोटो पोस्ट करताच युजर्सकडून त्यास कॉमेण्ट देण्यास सुरुवात केली गेली. कोणी या फोटोला खूपच सुंदर म्हणताना दिसत आहे, तर कोणी जहीर आणि सागरिकाला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र एका युजर्सने या फोटोला एक असे कॉमेण्ट दिले आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या युजरच्या कॉमेण्ट दुसºया एका युजरने उत्तर देताना ‘असाच प्रश्न तू तुझ्या बहिणीला विचार’ असे म्हटले आहे. 
 

त्या युजरने कॉमेण्ट देताना लिहिले की, ‘सागरिका हा फोटो सेक्सनंतरचा आहे काय?’ त्याला उत्तर देताना दुसºया युजरने लिहिले की, ‘अगदी योग्य प्रश्न विचारला, आता हाच प्रश्न तुझ्या बहिणीला हनिमूनला असताना विचार’. दरम्यान, या अगोदरही सागरिकाने जहीरचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये जहीर चेअरवर बसून, मेन्यू किंवा बिल न्याहाळत होता. तर या अगोदर सागरिकाने शेअर केलेल्या फोटोची टेनिसपटू सानिया मिर्झाने खिल्ली उडविली होती. ज्यानंतर सोशल मीडियावरून सानियावरही टीका करण्यात आली.  

Web Title: Sagarika Ghatge shared 'Haj' photo from bed; Reply to the user's comet, 'Think this question to your sister!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.