'हम आपके है कौन'ची रिटा आठवते का? अभिनय सोडून करतीये 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 14:33 IST2023-06-01T14:33:24+5:302023-06-01T14:33:54+5:30
Sahila chaddha: साहिलाने संजय दत्तच्या भावासोबत लग्न केलं असून तिने अभिनयापासून फारकत घेतली आहे.

'हम आपके है कौन'ची रिटा आठवते का? अभिनय सोडून करतीये 'हे' काम
बॉलिवूडच्या इतिहासातील माइलस्टोन सिनेमा म्हणजे हम आपके हैं कौन. राजश्री प्रोडक्शनचा हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच कशाला या सिनेमातील प्रत्येक कलाकाराची आजही चर्चा रंगते.त्यातलीच एक भूमिका म्हणजे रिटा. प्रेमसोबत लग्न करण्यासाठी आतुर झालेल्या रिटाला प्रेक्षकांनीही तितकंच प्रेम दिलं. विशेष म्हणजे या सिनेमात तिची भूमिका गाजली. मात्र, आता ती कलाविश्वातून फार दूर गेली आहे. त्यामुळे ती सध्या काय करते? आणि कशी दिसते हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.
'हम आपके हैं कौन' या सिनेमात रिटा ही भूमिका अभिनेत्री साहिला चड्ढा (sahila chaddha) हिने साकारली होती. या सिनेमानंतर ती बऱ्याच सिनेमांमध्ये झळकली. मात्र, एकाएकी तिने कलाविश्वातून काढता पाय घेतला. आजही ती अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येते. मात्र, रुपेरी पडद्यावर तिचा वावर पूर्वीसारखा राहिलेला नाही. वयाच्या १० व्या वर्षी साहिलाने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मिस इंडियाचाही खिताब जिंकला आहे. इतकंच नाही तर तिने त्यापूर्वी जवळपास २५ ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्या आहेत. साहिलाने साधारणपणे ५० सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, आता ती कलाविश्वापासून दूर गेली आहे.
साहिला सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते. विशेष म्हणजे तिच्या लूकमध्ये आता प्रचंड बदल झाला आहे. त्यामुळे तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
दरम्यान, साहिलाने संजय दत्तचा भाऊ निमय बाली याच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनय क्षेत्रात जरी ती सक्रीय नसली तरी तिचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. आजवर तिने अनेक टीव्ही मालिकांसह वेब सीरिज केल्या आहेत. तसंच साहिला हम आपके है कौन व्यतिरिक्त वीराना, सैलाब, धर्म संकट, मां, नमक, अब इंसाफ होगा, आंटी नंबर 1 सिनेमातही झळकली आहे.