सुरू झाली ‘गली बॉय’च्या रिमेकची तयारी! साऊथचा हा अभिनेता बनणार ‘स्ट्रिट रॅपर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 11:02 IST2019-02-19T11:01:37+5:302019-02-19T11:02:25+5:30
व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट तरूणाईने डोक्यावर घेतलाय. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी आहे. होय, ‘गली बॉय’ रिलीज होऊन काही दिवस होत नाही तोच या चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरु झाली आहे.

सुरू झाली ‘गली बॉय’च्या रिमेकची तयारी! साऊथचा हा अभिनेता बनणार ‘स्ट्रिट रॅपर’!
व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट तरूणाईने डोक्यावर घेतलाय. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी आहे. होय, ‘गली बॉय’ रिलीज होऊन काही दिवस होत नाही तोच या चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरु झाली आहे. होय, ‘गली बॉय’चा तेलगू रिमेक बनवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तेलगू निर्माते अल्लू अरविंद हा रिमेक बनवणार आहेत. आता रणवीरने साकारलेली स्ट्रिट रॅपरची भूमिका कोण साकारणार, असा तुमचा प्रश्न असेल तर त्याचेही उत्तर आमच्याकडे आहे. होय, साऊथ स्टार साई धर्म तेज या तेलगू रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अद्याप या तेलगू रिमेकची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लवकरच ती होईल, असे कळतेय.
‘गली बॉय’मध्ये रणवीरने साकारलेली रॅपरची भूमिका आणि आलियाने साकारलेली मुस्लिम तरूणी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. पहिल्या चारचं दिवसांत या चित्रपटात ७२ कोटींवर कमाई केली. कमाईचा हा आकडा बघता, लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळेच ‘गली बॉय’चा रिमेक बनत असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. फक्त या तेलगू ‘गली बॉय’ला किती यश मिळते, तेच पाहायचेय.
३२ वर्षीय साई धर्म तेज याने २०१४ मध्ये अॅक्टिंग डेब्यू केला होता. साई धर्म तेज हा साऊथ सुपरस्टर चिरंजीवीची बहीण विजया दुर्गा हिचा मुलगा आहे.