काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात रमली साई पल्लवी, चाहते म्हणाले, 'नॅचरल ब्युटी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 14:39 IST2023-07-09T14:35:46+5:302023-07-09T14:39:12+5:30
काश्मीरमध्ये कधी फुलांच्या भोवताली तर कधी नदी किनारी साईपल्लवी शांतता अनुभवत आहे.

काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात रमली साई पल्लवी, चाहते म्हणाले, 'नॅचरल ब्युटी...'
अभिनेत्री साईपल्लवी (Sai Pallavi) सध्याच्या प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती सिनेमाच्या शूटिंगनिमित्ताने काश्मीरमध्ये. तेथील वातावरणाचा ती आनंद घेत आहे. काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात एन्जॉय करतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. सध्या ती काश्मीरमध्ये SK 21 सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
काश्मीरमध्ये कधी फुलांच्या भोवताली तर कधी नदी किनारी साईपल्लवी शांतता अनुभवत आहे. हे क्षण ती एन्जॉय करताना दिसत आहे. तसंच यामध्ये तिचा लुक अतिशय साधा सरळ आहे. पांढरा टॉप आणि निळ्या रंगाच्या प्रिंटेड प्लाझोमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत. आजुबाजुला फक्त हिरवळ आहे. 'सध्याची मनाची परिस्थिती : शांतता, प्रसन्नता' असं छान कॅप्शन तिने फोटोंना दिलंय.
चाहतेही तिच्या या फोटोंवर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, 'तुम्हालाच असे सुंदर ठिकाणं कसे दिसतात. आम्हाला तर जाऊ तिथे फक्त घोडा आणि गायी दिसतात. ' साई पल्लवीच्या या फोटोंमध्ये बॅकग्राऊंडला काही घोडेही दिसत आहेत.
साई पल्लवी तिच्या साध्या सरळ राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिला 'नॅचरल ब्युटी' म्हणलं जातं. लवकरच ती 'SK 21' मध्ये दिसणार आहे. ही फिल्म कमल हसन यांनी निर्मित केली आहे. यामध्ये तिची आणि शिव कार्तिकेयनची जोडी आहे. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होणार आहे.