भर कार्यक्रमात सैफ अली खान अन् रणबीर कपूर यांच्यात वाद? Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:20 IST2024-12-16T13:19:27+5:302024-12-16T13:20:25+5:30
सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भर कार्यक्रमात सैफ अली खान अन् रणबीर कपूर यांच्यात वाद? Video व्हायरल
दिवंगत चित्रपट निर्माते-अभिनेता राज कपूर यांची 100 व्या बर्थडेसाठी निमित्त शुक्रवारी रात्री मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कपूर परिवार आणि कपूर कुटुंबाशी जोडला गेलेला प्रत्येक जण यावेळी पाहायला मिळाला. अभिनेत्री करीना कपूरसोबत तिचा पती अभिनेता सैफ अली खानदेखील सहभागी झाला होता. यावेळी दोघांचा रॉयल लूक पाहायला मिळाला. या कार्यक्रमातील विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, यातला एक व्हिडीओ सध्या जास्त चर्चेत आहे. ज्यामध्ये सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांच्यात वाद झाल्याचं दिसतंय.
सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतेय की, जेव्हा रणबीर कपूर सैफ अली खानला स्क्रिनिंगकडे जाण्याबद्दल सांगत असतो, तेव्हा सैफ थोडासा चिडलेला दिसत होता. सैफ कठोर स्वरात रणबीरला 'ओके' असे म्हणताना दिसतोय. दोघांमध्ये काही वाद झाला की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
राज कपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचे 10 सर्वात मोठे चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. जवळपास चार दशकांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राज कपूर यांचे सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या यादीत 'आग' (1948), 'बरसात' (1949), 'आवारा' (1951), 'श्री 420' (1955), 'जागते रहो' (1956), 'जिस देश में गंगा बहती है' (1960), संगम' (1964), 'मेरा नाम जोकर' (1970), 'बॉबी' (1973) आणि 'राम तेरी गंगा' मैली' (1985) यांचा समावेश आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संपूर्ण कपूर परिवाराने पंतप्रधान नरेंद मोदी यांना भेट दिली होती.