Saif Khan Attack: हल्ला झाल्यानंतर इब्राहिमने सैफला हॉस्पिटलला नेलं; तर वडिलांना बघायला साराची रुग्णालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:11 IST2025-01-16T13:09:32+5:302025-01-16T13:11:32+5:30

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच सैफचा लेक इब्राहिम खान त्याच्या घरी पोचला. इब्राहिमनेच सैफला ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. 

saif ali khan attack ibrahim khan admitted actor in hospital after attack sara khan reach to see dad video | Saif Khan Attack: हल्ला झाल्यानंतर इब्राहिमने सैफला हॉस्पिटलला नेलं; तर वडिलांना बघायला साराची रुग्णालयात धाव

Saif Khan Attack: हल्ला झाल्यानंतर इब्राहिमने सैफला हॉस्पिटलला नेलं; तर वडिलांना बघायला साराची रुग्णालयात धाव

Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी(१५ जानेवारी) रात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे.  या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच सैफचा लेक इब्राहिम खान त्याच्या घरी पोचला. इब्राहिमनेच सैफला ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. 

सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सैफला बघण्यासाठी सकाळी सारा खान आणि इब्राहिम लीलावती हॉस्पिटलला पोहोचले. हॉस्पिटलबाहेरचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सारा आणि इब्राहिम सैफला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याचं दिसत आहे. 


नेमकं काय घडलं? 

हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीसला भेटण्यासाठी हल्लेखोर घरात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  सैफवर हल्ला करण्याअगोदर हल्लेखोर सैफ-करीनाचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. हल्लेखोराला तैमुरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्याच खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आणि बाहेर आला. सैफने हल्लेखोर आणि मोरकणीला पाहिलं आणि हल्लेखोरला रोखण्यासाठी तो धावला. या झटापटीत हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. 

Web Title: saif ali khan attack ibrahim khan admitted actor in hospital after attack sara khan reach to see dad video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.