"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:40 IST2024-08-16T16:39:58+5:302024-08-16T16:40:18+5:30
Saif Ali Khan Birthday : आज सैफ अली खानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि पत्नी करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे.

"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली...
पटौडी खानदानचा नवाब सैफ अली खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. सैफने त्याच्या अभिनयाने एक काळ गाजवला. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सैफ अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. आज सैफ अली खानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि पत्नी करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सैफबरोबरचे दोन फोटो शेअर केले आहेत. ग्रीसमधील पाथनॉन या ठिकाणावरील हे दोन फोटो करीनाने शेअर केले आहे. यातील एक फोटो २००७ चा तर दुसरा फोटो २०२४ मधील असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. "happy birthday to the love of my life...२००७ ते २०२४...कोणी विचार केलेला? सगळे म्हणतात पुढे जात राहा...आणि ते आपण चांगल्या पद्धतीने केलं", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
करीनाच्या या पोस्टवर मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानने कमेंट केली आहे. तेजश्रीने कमेंट करत "Indeed" असं म्हटलं आहे. त्याबरोबरच अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही कमेंट करत सैफला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सैफने १९९१ मध्ये अमृता सिंगबरोबर लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर १३ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. २०१२ मध्ये सैफने करीनाशी दुसरा विवाह केला. त्यांना तैमुर आणि जेह ही मुले आहेत.