सैफ अली खानने ‘या’ स्पेशल लेडीसाठी खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 05:47 AM2017-03-27T05:47:49+5:302017-03-27T11:17:49+5:30
नवाब पतौडी सैफ अली खान याने २५ कोटी रूपयांचा एक महागडा फ्लॅट खरेदी केलाय. तोही कुणाला तरी गिफ्ट म्हणून ...
न ाब पतौडी सैफ अली खान याने २५ कोटी रूपयांचा एक महागडा फ्लॅट खरेदी केलाय. तोही कुणाला तरी गिफ्ट म्हणून द्यायला. आता सैफ गिफ्ट म्हणून कुणाला देणार? एक तर लाडक्या बेबोला अर्थात करिना कपूरला किंवा चिमुकल्या तैमूरला. होय ना? पण तुम्ही चुकताय. सैफने हा फ्लॅट करिनासाठी नाही तर दुसºयाच एका स्पेशल लेडीसाठी खरेदी केलाय. होय, ही व्यक्ति सैफच्या अगदी जवळची आहे. करिना या व्यक्तिवर जितके प्रेम करते, तितकेच प्रेम सैफ सुद्धा करतो. गोंधळलात ना? चला तर मग जास्त ताणून न धरता आम्ही तुम्हाला सांगून टाकतो. सैफने हे महागडे गिफ्ट दुसºया कुणरसाठी नाही तर स्वत:च्या सासूबाई बबितांसाठी घेतले आहे. आता जावयाकडून मिळालेल्या या गिफ्टने सासूबार्इंना किती आनंद झाला नसेल, याची कल्पना तुम्हीच करा.
ALSO READ : सैफ अली खानच्या फोटोने दिला धोका
बबिता सध्या युनियन पार्क अपार्टमेंटमध्ये राहतात. हे घर करण जोहरच्या घराच्या जवळ आहे. पण बबितांचे हे घर फार लहान आहे. त्यामुळे सासूबार्इंना थोडा प्रशस्त फ्लॅट द्यावा, असे सैफने ठरवले आणि लगेच तो कामाला लागला. मग काय, सासूबार्इंना त्याने मस्तपैकी चार बेडरूमचा अलिशान फ्लॅट गिफ्ट दिला. खार भागात १७ मार्गावर हा फ्लॅट आहे. विशेष म्हणजे, बबितांची मोठी मुलगी करिश्मा कपूर याच भागात अगदी हाकेच्या अंतरावर राहते. त्यामुळे बबितांना करिश्माची चांगली सोबत होणार आहे. एकंदर काय, तर जावयाने सासूबाईला अगदी हवे ते गिफ्ट दिले आहे. शेवटी असा जावई मिळायलाही भाग्य लागत. करिनाच्या निवडीवर याघडीला बबितांना अभिमान वाटत असावा, होय ना?