Saif Ali Khan: सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज, काही दिवस विश्रांतीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:56 IST2025-01-21T14:55:22+5:302025-01-21T14:56:15+5:30

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला होता.

Saif Ali Khan Discharged From Lilavati Hospital 6 Days After He Was Stabbed At Home In Mumbai | Saif Ali Khan: सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज, काही दिवस विश्रांतीचा सल्ला

Saif Ali Khan: सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज, काही दिवस विश्रांतीचा सल्ला

Saif Ali Khan Stabbed In Mumbai: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali khan) वांद्रे येथील राहत्या घरी एका चोराने घुसून जीवघेणा हल्ला केला होता. चोराने सैफच्या शरीरावर सहा ठिकाणी वार केले आणि या घटनेत अभिनेता गंभीर जखमी झाला. त्यानंतर सैफला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ अली खानवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सैफला आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज  (Saif Ali Khan To Get Discharged Lilavati Hospital) देण्यात आला आहे.  

सैफ अली खानच्याप्रकृतीत सुधारणा झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे. पत्नी करीना कपूर आणि मुलगी सारा अली खान या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. सैफला डिस्चार्ज दिला असला तरी त्याला डॉक्टरांनी आणखी काही  दिवस सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अभिनेत्याला काही दिवस चित्रपटाच्या शूटिंगपासून दूर राहावं लागणार आहे.

उपचारानंतर सैफचा मुक्काम सद्गुरु शरण ऐवजी फॉर्च्युन हाईट्समधल्या जुन्या घरी करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तैमूर आणि जेह यांची  खेळणी आणि सामान काल सद्गुरु शरण अपार्टमेंटमधून फॉर्च्यून हाइट्समध्ये नेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बाल्कनीला जाळ्या लावण्यात आल्या आहेत. गॅलरीतून कुणी घुसणार नाही, यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहेत.

 सैफ अली खानवरील हल्ल्याचा मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. सैफचा हल्लेखोर शहजाद बांगलादेशी आहे. शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आला होता.  पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिमकार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे.  पोलिसांनी अद्याप सैफ अली खानचा जबाब घेतलेला नाही. त्याला डिस्चार्ज मिळाल्यानं आता पोलीस त्याचा जबाब घेऊ शकतात. यामुळे पुढीत तपास आणखी वेगवान होईल. 

Web Title: Saif Ali Khan Discharged From Lilavati Hospital 6 Days After He Was Stabbed At Home In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.