सैफ अली खानने नाकारला होता 'दिल चाहता है', पण या अभिनेत्रीच्या सांगण्यावरुन बदलला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 02:05 PM2024-03-30T14:05:32+5:302024-03-30T14:06:34+5:30
Saif Ali Khan : सैफ अली खानने १९९३ मध्ये 'परंपरा' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले, परंतु यश मिळाले नाही. पण २००१ मध्ये रिलीज झालेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. या चित्रपटातील सैफच्या अभिनयाचे आणि पात्राचे खूप कौतुक झाले.
सैफ अली खान(Saif Ali Khan)ने १९९३ मध्ये 'परंपरा' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले, परंतु यश मिळाले नाही. पण २००१ मध्ये रिलीज झालेल्या 'दिल चाहता है' (Dil Chahta Hai) या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. या चित्रपटातील सैफच्या अभिनयाचे आणि पात्राचे खूप कौतुक झाले. २३ वर्षांनंतरही 'दिल चाहता है' हा सैफ अली खानच्या करिअरमधील मैलाचा दगड मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की सैफ अली खानने आधी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. खुद्द अभिनेत्यानेच एकदा याचा खुलासा केला होता.
'दिल चाहता है' रिलीज झाल्यानंतर सैफ अली खानची कारकीर्दीला गती मिळाली आणि त्याने मागे वळून पाहिले नाही. मात्र सैफ अली खानने याआधी हा चित्रपट नाकारला होता. याचे कारण सांगताना सैफने २००१ मध्ये पत्रकार निलोफर कुरेशीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो त्याच्या भूमिकेच्या लांबीवर खूश नव्हता. खरे तर 'दिल चाहता है'मध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत नव्हता. ते मध्यवर्ती पात्रही नव्हते. या चित्रपटात प्रिती झिंटा, अक्षय खन्ना, आमिर खान आणि डिंपल कपाडिया देखील होते.
यामुळे सैफने 'दिल चाहता है' नाकारला
सैफ अली खानला जेव्हा 'दिल चाहता है'मध्ये काम करण्यास नकार का दिला, याबद्दल विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, 'दुसऱ्या भागात माझे सीन्स खूपच कमी असल्याने मी नकार दिला होता. त्यात माझे मोजकेच सीन होते. डिंपल कपाडिया यांनी मला माझ्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले. याबाबत बोलू, असे आश्वासन जावेद अख्तर साहेबांनी दिले.
'दिल चाहता है'ला मिळालेल्या प्रतिसादाने अभिनेता भारावला
पण 'दिल चाहता है'च्या यशाने सैफ अली खानला आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, चित्रपटात भूमिका किती मोठी किंवा छोटी असली तरी फरक पडत नाही. सैफ म्हणाला होता, 'मला समजले की भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते. रेस्टॉरंट आणि कारमधील दोन दृश्यांमुळेच मी त्यावर सही केली. समीरला लोक विसरणार नाहीत हे मला माहीत होतं. मी खूप मेहनत केली. मला काही ना काही प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असली तरी ती इतकी जबरदस्त असेल असे वाटले नव्हते.
या चित्रपटांमध्ये सैफ दिसणार आहे
प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सैफ अली खान आता ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा' चित्रपटात दिसणार आहे. यासोबत तो तेलुगु सिनेमात पदार्पण करत आहे. याशिवाय त्याच्याकडे 'ज्वेल थीफ' नावाचा आणखी एक चित्रपट आहे.