'या' अभिनेत्याच्या सुरक्षा एजन्सीमार्फत सैफला कडक सेक्युरीटी, अमिताभ बच्चनही त्याच्या 'अंडर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:01 IST2025-01-22T15:00:47+5:302025-01-22T15:01:05+5:30

सैफने प्रसिद्ध अभिनेत्याकडून सेक्युरिटी घेतली आहे.

Saif Ali Khan Hires Ronit Roy Owned Security Agency After The Stabbing Incident | 'या' अभिनेत्याच्या सुरक्षा एजन्सीमार्फत सैफला कडक सेक्युरीटी, अमिताभ बच्चनही त्याच्या 'अंडर'

'या' अभिनेत्याच्या सुरक्षा एजन्सीमार्फत सैफला कडक सेक्युरीटी, अमिताभ बच्चनही त्याच्या 'अंडर'

Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्यात राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने सैफवर सहा वार केले. चाकूचा तुकडाच पाठीत अडकल्याने सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. लिलावती रुग्णालयात सैफवर दोन गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, पाच दिवसांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याने लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला काल डिस्चार्ज दिला. पण, यासंपुर्ण प्रकरणात सैफच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.  सैफ अली खानच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही नव्हता. तसेच कुठेलीही कडक सुरक्षा नव्हती. पण, आता मात्र सैफनं आपली सुरक्षा वाढवली आहे. 

सैफ अली खाननं बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीची निवड केली आहे. रोनित रॉय हा "Ace Security and Protection"  नावाच्या सिक्युरिटी कंपनीचा मालक आहे. रोनित रॉयच्या या कंपनीकडून सेलिब्रिटींना खासगी सुरक्षा पुरविण्यात येते. अमिताभ बच्चन,  करण जोहर यांसारख्या सेलिब्रिटींच्या सुरक्षेची जबाबदारी रोनित रॉयकडेच आहे. रोनित रॉयने २००० साली आमिर खानच्या 'लगान' सिनेमावेळी सिक्युरिटी एजन्सी सुरु केली होती.याच कंपनीकडून सैफ अली खान आणि त्याच्या संपुर्ण कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. 

सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्याहल्ल्यानंतर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सैफ राहतो त्या 'सतगुरु शरण' इमारतीतील फ्लॅटवर सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या आहेत. तसंच सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. दरम्यान, सध्या सैफची प्रकृती सुधारली आहे. पण, त्याला एक महिना सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली आहे. 


सैफवर हल्लाक करणारा आरोपी बांगलादेशचा, ठाण्यातून अटक

 सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला केल्यानंतर आरोपीला एका खोलीत बंद करण्यात आले होते. पण, तो तिथूनही फरार झाला होता. फक्त जिन्यात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी दिसला होता. त्यावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला.चार दिवसांपासून गुंगारा देत असलेल्या आरोपीला पोलिसांनी २० जानेवारी रोजी ठाणे शहरातून अटक केली. चौकशीनंतर आरोपीबद्दल माहिती समोर आली. आरोपी बांगलादेशी घुसखोर असून, त्याला परत जाण्यासाठी पैसे हवेत होते. इतकेच नाही, तर तो बांगलादेशचा राष्ट्रीय कुस्तीपटू देखील आहे. ७ महिन्यापूर्वी त्याने बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केली होती. 

Web Title: Saif Ali Khan Hires Ronit Roy Owned Security Agency After The Stabbing Incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.