मणक्याच्या सर्जरीनंतर सैफ अली खान इतका फिट कसा? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:16 IST2025-01-26T16:15:27+5:302025-01-26T16:16:06+5:30
मणक्याच्या सर्जरीनंतरही इतका फास्ट कसा चालतोय हा? युजर्सने विचारला प्रश्न

मणक्याच्या सर्जरीनंतर सैफ अली खान इतका फिट कसा? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, Video व्हायरल
अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला. रात्रीच्या सुमारास त्याच्या मुलांच्या बेडरुममध्ये घुसलेल्या चोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर सर्जरीही झाली. सहा दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. आज सैफ डिस्चार्ज नंतर पहिल्यांदाच घराबाहेर आला. कडक सुरक्षाव्यवस्थेसह तो कारमधून रवाना झाला.
सोशल मीडियावर सैफ अली खान-करीना कपूरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नेवी ब्लू टीशर्ट, जीन्स, गॉगल अशा लूकमध्ये सैफ बाहेर पडताना दिसला. व्हिडिओ तो अगदी फिट अँड फाईन दिसत आहे. तर त्याच्याआधी करीना कपूर बाहेर पडताना दिसली. ग्रे लूज शर्ट, लूज पँट आणि कॅप अशा लूकमध्ये ती कॅमेऱ्याकडे न पाहताच कारच्या दिशेने गेली. त्यांच्यासोबत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात असलेली दिसते. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र प्रश्नार्थक कमेंट्स केल्या आहेत. '६ वेळा वार झाल्यासारखा वाटत नाही', 'मणक्याच्या सर्जरीनंतर अशा प्रकारे चालणं, बसणं शक्यच नाही', 'इतका लवकर कसा बरा झाला', 'मुंबई पोलिस अधिकाऱ्यांचा फालतु वेळ वाया जात आहे' असं म्हणत नेटकऱ्यांनी सैफवर झालेल्या हल्ल्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सैफवर हल्ला केलेल्या आरोपी शरीफुलला अटक झाली आहे. मात्र अद्याप त्याची चौकशी आणि हा खरंच सीसीटीव्ही मधला तोच आरोपी आहे का याचा अजूनही तपास सुरु आहे. सुरुवातीला त्याचा जबाब घेतला गेला तेव्हा त्या रात्री नेमकं काय घडलं हे त्याने सांगितलं. मात्र आता सैफच्या घरातून मिळालेले फिंगरप्रिंट्स आणि आरोपीचे फिंगरप्रिंट्स हे मॅच झालेले नाहीत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सैफवरील हल्ल्याचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.