काय सैफ अली खानने सुरु केली पापा ‘टायगर’ पतौडींच्या बायोपिकची तयारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 06:00 AM2019-02-16T06:00:00+5:302019-02-16T06:00:02+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चनपासून दीपिका पादुकोणपर्यंत अनेक बडे स्टार्स बायोपिकमध्ये बिझी आहेत. याच शर्यतीत आणखी एक नाव सामील होण्याची शक्यता आहे. हे नाव आहे, अभिनेता सैफ अली खान याचे.
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चनपासून दीपिका पादुकोणपर्यंत अनेक बडे स्टार्स बायोपिकमध्ये बिझी आहेत. याच शर्यतीत आणखी एक नाव सामील होण्याची शक्यता आहे. हे नाव आहे, अभिनेता सैफ अली खान याचे. होय, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सैफने कदाचित आपल्या पापाच्या म्हणजे, मन्सूर अली खान पतौडी यांच्या बायोपिकची तयारी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी पापा मन्सूर अली खान पतौडी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा सैफने बोलून दाखवली आहे. पण आता कदाचित त्याचा इरादा पक्का झालाय. होय, सैफचे ताजे फोटो तरी हेच सांगणारे आहेत.
अलीकडे सैफ मुंबई एअरपोर्टवर दिसला. विमानतळातून बाहेर पडताना सैफच्या हातातील एका पुस्तकाने सगळ्यांचे लक्ष वेधले. होय, हे पुस्तक क्रिकेटवर आधारित होते.
तुम्हाला ठाऊक आहेच की, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवाब पतौडी यांचे नाव गौरवास्पद कामगिरीसाठी घेतली जाते. त्यामुळे सैफच्या हातातील पुस्तक पाहून नवाब पतौडी यांच्या बायोपिकची तयारी सुरु झाली असे मानले जातेय. एका मुलाखतीत बोलताना सैफने पापा नवाब पतौडी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अर्थात मी पापाची कधीच बरोबरी करू शकणार नाही. त्यामुळे त्यांची भूमिका पडद्यावर साकारण्याचा विचार येताच मला भीती वाटते, असे सैफ म्हणाला होता.
१९६७ साली मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरूद्ध विदेशी भूमीवर सर्वप्रथम टेस्ट सिरीज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. १९६१ ते १९७५ या काळात ते भारतासाठी ४६ कसोटी सामने खेळले. त्यापैकी ४० टेस्टमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्यांनी ३४.९१ च्या सरासरीने २ हजार ७९३ धावा केल्या. नाबाद २०३ धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी सहा सेन्चुरी झळकावल्या, तर १६ अर्धशतके ठोकली. यशस्वी भारतीय कॅप्टन म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. क्रिकेट कारकिदीर्ला सुरूवात केल्यानंतर वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांना आपल्या उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली. मात्र तरीही क्रिकेट कारकिर्दीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.