सैफ अली खानने 22 व्या वर्षी घेतली होती ड्रग्ज, कारण ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 05:01 PM2020-08-30T17:01:23+5:302020-08-30T17:16:10+5:30

अलीकडे सैफ अली खान एका टॉक शोमध्ये पोहोचला. यावेळी त्याने काही हैराण करणारे खुलासे केले.

saif ali khan revealed once he experienced with lsd help him to overcome from fear of darkness | सैफ अली खानने 22 व्या वर्षी घेतली होती ड्रग्ज, कारण ऐकून व्हाल थक्क

सैफ अली खानने 22 व्या वर्षी घेतली होती ड्रग्ज, कारण ऐकून व्हाल थक्क

googlenewsNext
ठळक मुद्देया टॉक शोमध्ये सैफने दिल्लीच्या एका नाईट क्लबमध्ये घडलेला प्रसंगही सांगितला.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आता सैफ अली खानचा एक  इंटरव्ह्यू वेगाने व्हायरल होत आहे. वयाच्या 22 व्या वर्षी एलएसडी ड्रग्ज घेतल्याचा खुलासा सैफने या मुलाखतीत केला आहे. ड्रग्ज घेतल्याचे कारणही त्याने सांगितले आहे.
अलीकडे सैफ अली खान एका टॉक शोमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने काही हैराण करणारे खुलासे केले होते.  आयुष्यात एकदा एलएसडी ड्रग्ज घेतल्याचेही यावेळी त्याने सांगितले होते. विशेष म्हणजे, अंधाराची भीती घालवण्यासाठी ड्रग्ज घेतल्याचे त्याने म्हटले होते.

काय म्हणाला सैफ
त्याने सांगितले की, वयाच्या 22 व्या वर्षी मी एलएसडीचे सेवन केले होते. अंधाराला मी खूप घाबरायचो. ही भीती घालवण्यासाठी मी हा अनुभव घेतला होता. मात्र यानंतर अंधाराला आणखी घाबरून चालणार नाही, याचा साक्षात्कार मला झाला.  त्यादिवसानंतर अंधाराला घाबरणे निरर्थक असल्याचे मला जाणवले.

नाईट क्लबमध्ये झाला होता हल्ला
या टॉक शोमध्ये सैफने दिल्लीच्या एका नाईट क्लबमध्ये घडलेला प्रसंगही सांगितला. त्याने सांगितले, त्या दिवशी नाईटक्लबमध्ये एक मुलगा माझ्याजवळ आला आणि त्याने मला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत डान्स करण्याची विनंती केली. मी नकार दिला. यानंतर तो माझी प्रशंसा करू लागला. परमेश्वराने तुला सुंदर चेहरा दिलाय, असे तो मला म्हणाला. त्याच्या तोंडून स्तूती ऐकून मी खूश झालो. पण अचानक त्याने माझ्या डोक्यावर व्हिस्कीची बॉटल फोडली. माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागले. इतके होऊनही तो थांबला नाही. त्याने पुन्हा माझ्यावर हल्ला केला. तो ठार वेडा होता. कदाचित त्या दिवशी त्याने मला जीवानिशी मारले असते.

Web Title: saif ali khan revealed once he experienced with lsd help him to overcome from fear of darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.