सैफच्या बहिणीनं मानले जेह अन् तैमूरचा जीव वाचवणाऱ्या मदतनीसांचे आभार, शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:16 IST2025-01-22T17:15:54+5:302025-01-22T17:16:07+5:30
सैफ सुखरुप घरी परतल्यामुळे खान कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.

सैफच्या बहिणीनं मानले जेह अन् तैमूरचा जीव वाचवणाऱ्या मदतनीसांचे आभार, शेअर केला फोटो
Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या मुंबईतील (Mumbai) राहत्या घरी घुसून (१६ जानेवारी) एका चोरट्याने हल्ला केला होता. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या जीवघेण्या हल्ल्यानंतर काल सैफ अली खान घरी परतला आहे. पाच दिवसानंतर अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सैफ सुखरुप घरी परतल्यामुळे खान कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.
सैफची बहीण सबा पतौडीने एक खास पोस्ट शेअर करत जेह आणि तैमूरचा जीव वाचवणाऱ्या दोन मदतनीसांचे आभार मानले आहेत. सबा पतौडीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने लिहलं, "आमच्या घरचे खरे हिरोज. ज्यांनी स्वत:ची पर्वा न करता आमच्या कुटुंबांसाठी खरी जोखीम उचलली. तुम्हा दोघींना खूप प्रेम… माझ्या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही आमचे हिरो आहात!", असं सबाने तिच्या पोस्टमध्ये लिहलं आहे. सबाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोन्ही मदतनीस दिसून येत आहेत.
सैफ घरी परतल्यावर आता कडक सुरक्षा करण्यात आली आहे. 'सतगुरु शरण' इमारतीतील फ्लॅटवर सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या आहेत. तसंच सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांचा कडक पहाराही आता सुंपर्ण खान कुटुंबावर असणार आहे. दरम्यान, सैफवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशचा असल्याचं समोर आलं आहे. इतकेच नाही, तर तो बांगलादेशचा राष्ट्रीय कुस्तीपटू देखील आहे. ७ महिन्यापूर्वी त्याने बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केली होती.